जळगाव : रमजान महिन्याच्या सुरुवातीला कलिंगडाला ठोक बाजारात २० ते २५ रुपये प्रतिकिलो असा चांगला दर मिळत होता. मात्र, अवघ्या दहा दिवसांतच हा दर कोसळून किलोमागे ७ ते १० रुपयांपर्यंत खाली दर आले आहेत. अचानक झालेल्या या दरघटीमुळे तालुक्यातील कलिंगड उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
यंदा उन्हाळ्याची तीव्रता आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर कलिंगडाला मोठी मागणी राहील, असा अंदाज शेतकऱ्यांचा होता. अनेकांनी मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणात लागवड केली. सुरुवातीच्या काळात चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्नाची अपेक्षा होती.
बाजारात आवक वाढल्याने आणि मागणी घटल्याने भावात घसरण झाली. कलिंगड पिकासाठी एकरी साधारण ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. सुधारित बियाणे, खते, कीटकनाशके तसेच मजुरी यावर मोठा खर्च करावा लागतो.
आम्ही तीन एकर क्षेत्रात कलिंगडाची लागवड केली होती. सुरुवातीला बाजारात सुमारे २३ रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने खर्च व कर्ज निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता बाजारात कलिंगड येताच केवळ ७ ते ८ रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने मोठे नुकसान होत आहे. सध्या मिळत असलेल्या १० रुपयांच्या दरात खर्चही निघणे कठीण झाले आहे.- बाबूराव नथ्थू कोळी, शेतकरी, तळेगाव ता. जामनेर
वाचा आजचे बाजारभाव
| बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
|---|---|---|---|---|---|---|
| 10/03/2026 | ||||||
| मुंबई - फ्रुट मार्केट | --- | क्विंटल | 9615 | 1800 | 2200 | 2000 |
| खेड-चाकण | --- | क्विंटल | 505 | 1200 | 1700 | 1400 |
| सोलापूर | लोकल | क्विंटल | 695 | 500 | 2200 | 1200 |
| सांगली -फळे भाजीपाला | लोकल | क्विंटल | 660 | 800 | 2000 | 1400 |
| पुणे | लोकल | क्विंटल | 3123 | 1000 | 2000 | 1500 |
| पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 945 | 1200 | 1500 | 1350 |
| भुसावळ | लोकल | क्विंटल | 6 | 1000 | 1500 | 1500 |
Web Summary : Watermelon prices plummeted in Jalgaon within ten days, from ₹25 to ₹10 per kg. Farmers who invested heavily in cultivation now face significant financial losses due to the sudden price drop caused by increased market supply and reduced demand.
Web Summary : जलगाँव में दस दिनों के भीतर तरबूज की कीमतें ₹25 से गिरकर ₹10 प्रति किलो हो गईं। जिन किसानों ने खेती में भारी निवेश किया, वे अब बाजार में आपूर्ति बढ़ने और मांग घटने के कारण अचानक कीमतों में गिरावट से भारी वित्तीय नुकसान का सामना कर रहे हैं।