Join us

हळदीचं झालं सोनं; सोयाबीन मात्र आपटलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 11:57 AM

सोयाबीनची भावकोंडी कायम असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. तर मागील चार दिवसांत हळदीला चांगली भाववाढीची झळाळी मिळाली आहे.

हिंगोली येथील मार्केट यार्डात मागील चार दिवसांत हळदीला जवळपास दोन ते अडीच हजारांनी भाववाढीची झळाळी मिळाली. ११ मार्च रोजी १८ हजार ३५० रुपयांचा पल्ला गाठला. या दिवशी १ हजार ३०० क्विंटलची आवक झाली होती. तर, सोयाबीन दराला मात्र उतरती कळा कायम आहे.

हिंगोली येथील संत नामदेव महराज मार्केट यार्डात नव्या हळदीची आवक सुरू झाली आहे. हंगामाच्या सुरूवातीला सध्या नवीनची आवक कमी असली तरी अजूनही गेल्या वर्षीची हळद शेतकऱ्यांकडे आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत आठवड्यापासून भाव वधारल्याने शेतकरी हळद विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे मार्केट यार्डात आवक वाढली आहे.

सोमवारी (दि. ११) रोजी १ हजार ३०० क्विंटल हळद बाजारात विक्रीसाठी आली होती. किमान १५ हजार १०० ते कमाल १८ हजार ३५० भाव मिळाला. मागील चार दिवसांत जवळपास दोन ते अडीच हजारांनी भाव वधारल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.success story हळद आणि आल्यात या परभणीच्या शेतकर्‍याचा नाद नाही करायचा 

तर दुसरीकडे मात्र सोयाबीनची भावकोंडी कायम असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे.  मार्केट यार्डात सोमवारी (दि. ११) रोजी ३०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ज्यास ४ हजार ते ४ हजार ४०९ रुपये एवढा भाव मिळाला.

तसेच ८०० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. ज्यास ५ हजार १५० ते ५ हजार ५०० रुपये भाव मिळाला. तर तूर सरासरी ९ हजार ८३७ रुपये प्रती क्विंटलने विक्री झाली.

टॅग्स :बाजारमार्केट यार्डमार्केट यार्डशेतीशेतकरीमहाराष्ट्र