Join us

Tur Bajar Bhav : बार्शीत तुरीची आवक वाढली; काळ्या तुरीला मिळतोय सर्वाधिक भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:22 IST

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाढली असून, यंदाही दररोज ५ कट्टे आवक होत आहे.

बार्शी : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाढली असून, यंदाही दररोज ५ कट्टे आवक होत आहे.

मात्र, यंदा मागील वर्षीच्या तुलनेत दर क्विंटलमागे ५०० ते १,००० रुपये कमी आहेत. तुरीच्या प्रकारानुसार खालीलप्रमाणे दर मिळत आहे.१) पांढऱ्या तुरीला ६,८०० - ७,५००२) तांबडी ६,६०० - ७,४००३) काळी ८,००० - ८,६०० दर मिळत आहे.

यंदाच्या हंगाम सुरुवातीला ही ८,०००-८,५०० दर होता. मागील वर्षी तो ९,५०० क्विंटल होता.

यंदा आवक वाढल्याने दर मागील वर्षीच्या तुलनेत २,००० रुपयांनी, तर यंदा १ हजार रुपयांनी कमी आले असल्याचे खरेदीदार सचिन मडके यांनी सांगितले.

बार्शीतही तूरडाळीचे कारखाने मोठ्या प्रमाणात असल्याने इथेसुद्धा प्रक्रिया करण्यासाठी माल भरपूर लागतो. त्यामुळे खरेदीदार संख्याही जास्त आहे.

अधिक वाचा: Harbhara Cut Worm : हरभऱ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या ह्या अळीचे कसे कराल नियंत्रण?

टॅग्स :तूरबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती