Join us

पावसामुळे टोमॅटोचे दर वधारले पण नुकसानीमुळे हातचे पीक देखील डोळ्यादेखत संपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 17:55 IST

Tomato Market Rate : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर दिसून येत आहे. विशेषतः टोमॅटोच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असून, बुधवारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २० किलो टोमॅटोचा कॅरेट ७५० ते ८०० रुपयांना विकला गेला. 

सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भाजीपाला ठिकाणी बाजारात येण्यापूर्वीच खराब होत असल्याने आवक लक्षणीय घटली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे भाजीचे उत्पादन वाढण्याची शक्यता नसल्याने आवाक घटत असल्याने भाजीचे भाव कमी होण्याऐवजी पुढील काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टोमॅटोसोबतच कांदा, बटाटा, कोथिंबीर, वांगी, मिरची यांसारख्या इतर भाजीपाल्यांच्या दरातही झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे दर मिळत आहे मात्र हाती काहीच नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे कारण पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरीवर्गही अडचणीत सापडला आहे. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील टोमॅटो आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/07/2025
कोल्हापूर---क्विंटल224100025001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल80250030002750
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल585120020001600
राहूरी---क्विंटल125001000750
खेड-चाकण---क्विंटल292150025002000
श्रीरामपूर---क्विंटल23100015001250
सातारा---क्विंटल73100020001500
राहता---क्विंटल4050030001700
कल्याणहायब्रीडक्विंटल3200025002250
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल13301035003320
अकलुजलोकलक्विंटल18100020001500
पुणे- खडकीलोकलक्विंटल9100017001350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10200020002000
पुणे-मोशीलोकलक्विंटल543150020001750
नागपूरलोकलक्विंटल750300035003350
वाईलोकलक्विंटल10100025001750
कामठीलोकलक्विंटल10250035003000
हिंगणालोकलक्विंटल25350040003627
पनवेलनं. १क्विंटल735350040003750
मुंबईनं. १क्विंटल1635240030002700
रत्नागिरीनं. १क्विंटल48200025002300
सोलापूरवैशालीक्विंटल35130020001000
नागपूरवैशालीक्विंटल600300035003350
भुसावळवैशालीक्विंटल28200025002200

आवक घटल्याने दरात वाढ

सध्या बाजारात टोमॅटोची आवक अत्यंत कमी आहे आणि मागणी जास्त असल्यामुळे दर गगनाला भिडले आहेत. येत्या काही दिवसांतही हे दर वाढण्याची शक्यता आहे. - हरीष माळी, अडत दुकानदार, कृषी उत्पन्न बाजारी समिती, धुळे.

हेही वाचा : जांभूळ शेतीतून लाखोंची लॉटरी; दलदलमय जमिनीवर दत्तात्रय यांचा बहाडोली जांभूळ शेतीचा यशस्वी प्रयोग

टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डधुळे