नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक आठवड्यात टोमॅटोचे भाव किलोमागे १६ ते ३४ रुपयांवरून २६ ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ८० रुपयांवर गेले.
एक आठवड्यात दर दुप्पट झाले आहेत. शेवगा, भेंडी व गवारचे दरही वाढले आहेत. वाटाणा, कोबी, फ्लॉवरसह पालेभाज्यांचे दर मात्र नियंत्रणात आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
हिवाळा सुरू झाल्यापासून राज्यात टोमॅटोचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. बाजार समितीमध्ये बुधवारी १८६ टन टोमॅटोची आवक झाली आहे.
मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी झाल्याने दर आठवडाभरात दुप्पट झाले. रोज दरात वाढ होत आहे. किरकोळ मार्केटमध्येही दर वाढण्यास सुरूवात झाली आहे. बाजार समितीमध्ये ४४६ टन वाटाण्याची आवक झाली आहे.
आवक वाढल्यामुळे दर ५० ते ७० रुपये किलोवरून ३० ते ४० रुपयांवर आले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये वाटाणा ६० ते ७० रुपये किलो दराने विकला जात आहे.
होलसेल व किरकोळ मार्केटमधील दरवस्तू - होलसेल - किरकोळटोमॅटो - २६ ते ६० - ६० ते ८०भेंडी - ५२ ते ७० - १०० ते १२०गवार - ७० ते १०० - १४० ते १६०शेवगा शेंग - १६० ते २०० - ३२० ते ४००वाटाणा - ३० ते ४० - ६० ते ७०कोबी - १० ते १६ - ४० ते ५०फ्लॉवर - १० ते १४ - ४० ते ६०दुधी भोपळा - १६ ते २४ - ५० ते ६०
अधिक वाचा: शेततळे योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार; आता 'ही' नवीन पद्धत लागू
Web Summary : Tomato prices doubled in Mumbai market within a week, reaching ₹60/kg wholesale, ₹80/kg retail. Other vegetables like okra and cluster beans also saw price hikes, while leafy vegetables remained stable. Increased demand and reduced supply drove the price surge.
Web Summary : मुंबई बाजार में एक सप्ताह में टमाटर के दाम दोगुने हो गए, थोक में ₹60/किग्रा, खुदरा में ₹80/किग्रा तक पहुंच गए। भिंडी और ग्वार जैसी अन्य सब्जियों की कीमतों में भी वृद्धि हुई, जबकि पत्तेदार सब्जियां स्थिर रहीं। बढ़ी हुई मांग और कम आपूर्ति ने कीमतों में वृद्धि की।