Join us

यंदाच्या मूग खरेदीचा 'या' प्रसिद्ध बाजार समितीत शुभारंभ; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:22 IST

यंदाच्या खरीप हंगामातील मुगाचे मंगळवारी बाजार समितीत आगमन झाले. पदार्पणातच या मुगाला प्रतिक्विंटल नऊ हजार रुपये भाव मिळाला. सुरुवातीलाचं नऊ हजारांचा भाव मिळाल्याने हे दर आणखी वाढू शकतात, असे यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले.

यंदाच्या खरीप हंगामातील मुगाचे मंगळवारी चाळीसगाव (जि. जळगाव) येथील बाजार समितीत आगमन झाले. पदार्पणातच या मुगाला नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सुरुवातीलाचं नऊ हजारांचा भाव मिळाल्याने हे दर आणखी वाढू शकतात, असे यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले.

परिसरात यंदा पर्जन्यमान कमी असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मध्यंतरी झालेल्या पावसाने दुबार पेरणीचे संकट टळले असले, तरी पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे. अशा स्थितीत बाजार समितीत आलेल्या मुगाच्या दरामध्ये तेजी आहे. शिंदी येथील शेतकरी गंगाधर कौतिक आगोणे यांनी मूग विक्रीसाठी बाजार समितीत आणला होता. लिलाव सुरू होण्यापूर्वी हंगामातील मुगाचे पहिले उत्पन्न पूजन सभापती प्रदीप पाटील यांनी केले. यावेळी लिलाव प्रक्रिया झाली.

यात नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल असा सर्वोच्च भाव मिळाला. यामुळे उत्पादक शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले. उपसभापती शैलेंद्रसिंह पाटील, संचालक साहेबराव राठोड, प्रदीप देशमुख, नवल पवार, सचिव जगदीश लोधे, सहायक सचिव सतीश पाटील, पर्यवेक्षक प्रवीण वाघ, बाजार समितीचे वरिष्ठ लिपिक सुनील गुरव, संजय जाधव यांच्यासह बाजार समितीचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी व बाजार समितीचे खरेदीदार व्यापारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील मूग आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/08/2025
लासलगाव---क्विंटल38300095019000
दोंडाईचा---क्विंटल7673667366736
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1671167116711
राहूरी -वांबोरी---क्विंटल1800080008000
कारंजा---क्विंटल20440066556195
जालनाचमकीक्विंटल16605065116511
खामगावचमकीक्विंटल5658565856585
शिरपूरचमकीक्विंटल9720074517275
येवलाहिरवाक्विंटल17697489258925
अकोलाहिरवाक्विंटल61610575757310
यवतमाळहिरवाक्विंटल4610064956297
पुणेहिरवाक्विंटल35900096009300
मालेगावहिरवाक्विंटल6610071716461
हिंगणघाटहिरवाक्विंटल34580070006200
बीडहिरवाक्विंटल3660066006600
वणीहिरवाक्विंटल202577072756900
नांदगावहिरवाक्विंटल17876897519650
औसाहिरवाक्विंटल2300030003000
तुळजापूरहिरवाक्विंटल30650068006700
मंगरुळपीरहिरवाक्विंटल7450069956700
सिंदी(सेलू)हिरवाक्विंटल4600060006000
दुधणीहिरवाक्विंटल2660073217321
सांगलीलोकलक्विंटल70877096009185
मुंबईलोकलक्विंटल17788001100010000
वर्धालोकलक्विंटल15620567056450
गेवराईलोकलक्विंटल12679180017775
अहमहपूरलोकलक्विंटल3560056005600
अमरावतीमोगलीक्विंटल4650070006750
शिरुरनं. २क्विंटल3700080007500

हेही वाचा : पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी

टॅग्स :बाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेती क्षेत्रशेतकरीपीक