Join us

तिखट बनवायचा विचार सुरु आहे; लाल मिरचीच्या बाजारभावात झालीय घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 10:24 AM

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नवीन लाल मिरचीचे भाव निम्म्याने कमी झाले आहेत. त्यामुळे तिखट खाणाऱ्यांसाठी तिखटाचा वापर गरजेनुसार करता येणे परवडणार आहे.

तिखट, झणझणीत खाणाऱ्यांसाठी लाल मिरची गोड झाली, असा मथळा वाचल्यावर तुम्ही थोडे संभ्रमात पडला असाल. पण, बाजारपेठेत फेरफटका मारल्यावर याची सत्यता लक्षात येते.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नवीन लाल मिरचीचे भाव निम्म्याने कमी झाले आहेत. त्यामुळे तिखट खाणाऱ्यांसाठी तिखटाचा वापर गरजेनुसार करता येणे परवडणार आहे.

दुसरीकडे मिरची स्वस्त झाली असली तरी सावधान, कारण अतितिखट खाणे अनेकांना महाग पडू शकते. त्यामुळे आरोग्यासाठी किती तिखट खायचे हे प्रत्येकाच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असल्याचे आहारतज्ज्ञ यांचे म्हणणे आहे.

कशामुळे लाल मिरची स्वस्त?सर्वाधिक लाल मिरची उत्पादक राज्य म्हणजे आंध्रप्रदेश होय, या राज्यात मिरचीचे उत्पादन यंदा मुबलक प्रमाणात झाले आहे. तसेच, कर्नाटक राज्यातही लाल मिरचीचे उत्पादन समाधानकारक आहे. यामुळे नवीन लाल मिरचीची आवक वाढली व भाव कमी झाले आहेत.

लाल मिरचीचे भाव काय?

प्रकारफेब्रु. २३फेब्रु. २४
तेजा (कर्नाटक)३०० ते ३५०२५० ते ३००
बेडगी७०० ते ७५०३०० ते ३५०
गुंटूर (आंध्रप्रदेश)३५० ते ३५०२५० ते २८०
चपाटा५०० ते ५५०३०० ते ४००
रसगुल्ला९५० ते १०००६५० ते ७५०

उन्हाळ्यात लाल मिरची खरेदीचा हंगाम असतो. या काळात नवीन मिरची बाजारात येते. भाव कमी असल्याने ही लाल मिरची खरेदी करून तिचे वर्षभर पुरेल एवढे तिखट करून ठेवले जाते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाव कमी असल्याने वार्षिक मिरची खरेदीसाठी ग्राहक बाजारात येत आहेत.

टॅग्स :मिरचीशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डआंध्र प्रदेश