Join us

नारायणगाव बाजारात चक्क केंद्रीय कृषिमंत्र्यांनी केला टोमॅटोचा लिलाव; कसा मिळाला भाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:42 IST

Tomato Bajar Bhav कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर अंतर्गत असलेल्या नारायणगाव उपबाजार केंद्रात केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी टोमॅटो क्रेटच्या लिलावाची बोली केली.

नारायणगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर अंतर्गत असलेल्या नारायणगाव उपबाजार केंद्रात केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी टोमॅटो क्रेटच्या लिलावाची बोली केली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील शेतकऱ्याला २० किलोच्या टोमॅटो क्रेटला आजचा उच्चांकी असा ४५१ रुपये बाजार भाव मिळवून दिला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्राला केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भेट दिली. यावेळी अकोले तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथून १०० टोमॅटो क्रेट घेऊन आलेले विजय पारोसा या शेतकऱ्याची चांदीच झाली.

सध्या टोमॅटोच्या २० किलो क्रेटला २५० ते ३०० रुपये प्रतिक्रेट बाजारभाव आहे. कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे बाजार समितीतील शेतकऱ्यांची संवाद साधत असताना टोमॅटो क्रेट घेऊन आलेले विजय पारोसा यांच्या टोमॅटो क्रेट बोली सुरू केली.

अखेर बोलीमध्ये अंतिम बाजार ४५१ रुपये बाजारभाव प्रती क्रेट मिळाला. हा लिलाव व्यापारी गणेश फुलसुंदर यांनी घेतला.

शिवराज सिंह चौहान यांनी टोमॅटो मार्केटची पाहणी करत बाजार समितीच्या गेटपर्यंत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व शेतकऱ्यांसमवेत पदयात्रा काढली. यावेळी बाजार समितीच्या वतीने शिवराज सिंह चौहान यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश ताजणे, धनेश संचेती, जनार्दन मळभर, पांडूशेठ घाडगे, जितेंद्र कासार, आरती वारुळे, प्रियंका शेळके, विमल तळपे, सचिव रूपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे उपस्थित होते.

अधिक वाचा: काढणी झालेल्या पिकांचीही नुकसान भरपाई मिळणार? प्रस्ताव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आदेश

टॅग्स :टोमॅटोबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनारायणगावशिवराज सिंह चौहानमंत्रीशेतकरीअहिल्यानगर