पर्यटन हंगाम बरहत असतानाच अलिबाग तालुक्यात ताडफळांचा दर तेजीत आहे. गेल्यावर्षी ही फळे प्रति डझन १०० या दराने विकण्यात येत होती. आता त्यामध्ये ३० रुपयांनी वाढली आहे.
नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ताडफळे अलिबाग तालुक्यातील बहुसंख्य बाजारात विक्रीसाठी बाजारात येतात, तर एप्रिल व मे मध्ये त्यांची आवक वाढते. यंदा ही फळे आतापासूनच तेजीत आहेत.
सध्या त्याचा भाव १३० रुपये असला तरी काही ठिकाणी आकारानुसार १०० ते १५० रुपये डझनाने विक्री होत आहे. पर्यटन व्यवसाय तेजीत असल्याने त्यांना मागणी अधिक आहे. अलिबाग तालुक्यातील नागाव, चौल, भोवाळे, पालव आदी गावांतून प्रामुख्याने ताडफळे विक्रीसाठी येतात.
हेही वाचा : बाजारात कलिंगड अन् खरबूजची आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर