Join us

Soybean Market : सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 17:39 IST

Soybean Market : बाजार समित्यांत मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर सतत घसरत होते. अशातच शुक्रवारपासून ही घसरण काहीशी थांबली असून, सोयाबीनच्या दरात थोडी सुधारणा झाल्याचे दिसून आले.

वाशिम : जिल्ह्यातील बाजार समित्यांतMarket Yard मागील काही दिवसांपासून सोयाबीनचेSoybean दर सतत घसरत होते. अशातच शुक्रवार (२७ डिसेंबर) पासून ही घसरण काहीशी थांबली असून, सोयाबीनच्या दरात थोडी सुधारणा झाल्याचे दिसून आले.

शुक्रवारी मंगरुळपीर बाजार समितीत सोयाबीनला ४ हजार ४३० रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला, तर शनिवारी (२९ डिसेंबर) रोजी रिसोड बाजार समितीतही सोयाबीनला कमाल ४ हजार ३१० रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम देशांतर्गत आणि जिल्ह्यातील बाजार समित्यांतही पाहायला मिळत आहे.मागील जवळपास महिनाभरापासून सोयाबीनच्या दरात थोडी थोडी घसरणच दिसून आली. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांत कमाल ४ हजार १०० रुपये प्रती क्विंटल दरानेच सोयाबीनची खरेदी होऊ लागली होती. त्यामुळे शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण पसरले होते.

अशातच शुक्रवार(२८ डिसेंबर) पासून सोयाबीनच्या दरात थोडी सुधारणा होत असल्याचे दिसले. शुक्रवारी मंगरुळपीर बाजार समितीत सोयाबीनला कमाल ४ हजार ४३० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचा दर मिळाला, तर शनिवारी रिसोड बाजार समितीतही सोयाबीनला कमाल ४ हजार ३१० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचा दर मिळाला.

कारंजा बाजारातही दिसली वाढ

मंगरुळपीर बाजार समितीत शुक्रवारी सोयाबीनला ४ हजार ४३० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचा दर मिळाला असतानाच कारंजा बाजार समितीतही मागील १५ दिवसानंतर सोयाबीनच्या दरात शुक्रवारी सुधारणा दिसली. या बाजार समितीत सोयाबीनला ४ हजार २६५ रुपये प्रती क्विंटलपर्यंतचा दर मिळाला.

वाशिम, मानोऱ्यात दर स्थिरच!

मागील दोन दिवसांत रिसोड, मंगरुळपीर आणि कारंजा बाजार समितीत सोयाबीनच्या दरात थोडी वाढ दिसून आली असली तरी मानोरा आणि वाशिम बाजार समितीत मात्र, सोयाबीनचे दर मागील काही दिवसांपासून स्थिरच असल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी वाशिम बाजार समितीत सोयाबीनला कमाल ४ हजार १४०, तर शनिवारी ४ हजार १८० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळाले.हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हळदीच्या आवकेत आणि किंमतीत घट, वाचा मागील आठवड्यातील दर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डबाजार समिती वाशिमवाशिम