Join us

Soybean Market : सोने-चांदीने गाठला उच्चांक; सोयाबीनला मात्र कवडीमोल भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:47 IST

Soybean Market दिवाळीच्या खरेदीसाठी अहिल्यानगर शहराच्या बाजारात गर्दी दिसत आहे. या उत्साहाच्या वातावरणात शेतकरी आणि सामान्य नागरिक मात्र आर्थिक चढउतारांमुळे काहीसा चिंतेत आहे.

योगेश गुंडकेडगाव: दिवाळीच्या खरेदीसाठी अहिल्यानगर शहराच्या बाजारात गर्दी दिसत आहे. या उत्साहाच्या वातावरणात शेतकरी आणि सामान्य नागरिक मात्र आर्थिक चढउतारांमुळे काहीसा चिंतेत आहे.

एकीकडे सोने-चांदीच्या भावाने उसळी घेतली आहे, तर दुसरीकडे अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कवडीमोल भाव मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सोयाबीनचे भात कोसळले आहेत.

जुलै-ऑगस्टमधील अतिवृष्टी आणि सप्टेंबरमधील सततच्या पावसामुळे सोयाबीनसह मूग आणि उडदाचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे.

सध्या अहिल्यानगर बाजार समितीत दररोज ११०० ते १२०० क्टिंटल सोयाबीनची आवक सुरू आहे. मात्र, बहुतांश माल ओलसर व डागाळलेला असल्याने त्याला अपेक्षित दर मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

सोयाबीनचे भाव पडल्याने चिंता वाढली◼️ महाराष्ट्रात निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली असतानाच सोयाबीनच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी चिंतेत आहे. हमीभावापेक्षाही कमी दराने सोयाबीन विकावे लागत आहे.◼️ त्यामुळे सोयाबीनचे दर वाढविण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ केली होती.◼️ त्याचा परिणाम लगेच बाजारावर जाणवला आणि सोयाबीनच्या दरात २००-३०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली. पण नंतर भाव घसरत गेले.◼️ ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात सोयाबीनला सरासरी ३६०० ते ४१०० रुपये दर मिळाला आहे.

शेतीमालाचे दर घसरलेकेंद्र सरकारने सोयाबीनसाठी ५ हजार ३२८ प्रतिक्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे, परंतु बाजारात सोयाबीनला सध्या ३ हजार ते ४१०० प्रतिक्विंटल असाच दर मिळत आहे.

अन्नधान्याचे बाजारभाव (दर प्रतिक्विंटल)गहू - २६०० ते २६५०ज्वारी - २१०० ते ३३००बाजरी - १८०० ते २६००तूर - ५००० ते ७०००हरभरा - ४८०० ते ५४००मुग - ५००० ते ८०००उडीद - ४००० ते ५६००सोयाबीन - ३६०० ते ४१००

सोने-चांदीचे दर गगनालादिवाळी आणि लग्नसराईच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. केवळ एका आठवड्याच्या आत चांदीच्या दरात तब्बल १९ हजार रुपयांची (१३ टक्के) वाढ झाली आहे, तर सोन्याचे दरही ४ टक्क्याने वाढले आहेत. सध्या सोन्याचे दर १ लाख २३ हजार रुपये प्रतितोळा आणि चांदीचे दर १ लाख ६८ हजार रुपये किलो असे झाले आहेत.

अधिक वाचा: फळात गराचे प्रमाण अधिक असलेला सीताफळाचा नवीन वाण आला; काय आहेत वैशिष्ट्ये? वाचा सविस्तर

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीदिवाळी २०२५शेतकरीशेती