मुंबई : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा हा सोयाबीनचे घटलेले दर हाच होता. निवडणुकीपूर्वी खरोखरच चार हजाराच्या आत असलेले सोयाबीनचे दर शुक्रवारी अचानक पाच हजाराच्या वर गेले.
शेतकऱ्यांसाठी ही सुखद घटना असली तरी सोयाबीनच्या दराने सत्ताधारी पक्षाच्या नाकी दम आणला होता. राज्यात या वर्षी सोयाबीनचा विक्रमी पेरा झाला होता. एकूण खरीप क्षेत्राच्या ३४ टक्के क्षेत्रात सोयाबीनचा पेरा झाला होता. उत्पादनही विक्रमी येणार असाच अंदाज होता.
सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ४८९२ रुपये इतके किमान आधारभूत मूल्य जाहीर केले असले तरी सुरुवातीच्या काळात हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात होती.
ऐन निवडणुकीत सोयाबीनचे भाव चार हजाराच्या आतच होते. यासाठी राज्य सरकारने राज्यात हमीभावाने खरेदी केंद्रे उघडली परंतु निवडणूक काळात ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकली नाहीत.
पिवळ्या सोयाबीनला चांगला भावविविध बाजारसमित्यांमध्येही व्यापाऱ्यांकडून वाढीव दराने सोयाबीन खरेदी सुरु केली आहे. विशेषतः पिवळ्या सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीत सोयाबीनच्या दरावरून विरोधकांनी प्रचारात राळ उठविली होती. त्याचा फटका महायुतीला बसला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सोयाबीनला हमीभाव ४८९२ इतका जाहीर करत हमीभाव केंद्रे सुरू केली. दर वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
शुक्रवारी राज्यातील विविध बाजारातील दरशहर - किमान - कमालकोरेगाव - ४८९२ - ४८९२जळकोट - ४२९१ - ४३६५परभणी - ४२५० - ४३५५जळगाव - ४२५० - ४३५०अकोला - ४१९५ - ४३५५वाशिम - ४३५० - ५१००मेहकर - ४३०० - ४४४०महागाव - ४२०० - ४४००यवतमाळ - ४०९७ - ४३९५घाटंजी - ४२५० - ४४००झरीजामिनी - ४८९२ - ४८९२जालना - ४१५० - ४४००कळमणुरी - ४५०० - ४५००गंगाखेड - ४३५० - ४४००मंगरूळपीर - ३६०० - ४८९२सांगली - ४८९२ - ५१००चिखली - ३८२१ - ४६७१