Join us
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातबंदीमुळे बटाटे, द्राक्ष, संत्र्याआड कांद्याची ‘स्मगलिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 18:57 IST

कांदा निर्यातबंदी नंतर आता चक्क कांद्याची तस्करी सुरू असून श्रीलंकेत ३५, तर दुबईत १५ कंटेनर दाखल झाले आहेत. बांगलादेश सीमेवर ८ ट्रक पकडले असल्याची माहिती आहे.

सुनील चरपेकेंद्र सरकारने निर्यातबंदी लावल्यानंतर कांद्याच्या ‘स्मगलिंग’ला सुगीचे दिवस आले आहेत. श्रीलंकेत ३५, दुबईत १५ आणि मलेशियात १० कंटेनर भारतीय कांदा आढळून आला आहे. बांगलादेशच्या सीमेवर शुक्रवारी (दि.१९) कांद्याचे आठ ट्रक पकडले आहेत. विशेष म्हणजे, बटाटे आणि नागपुरी संत्र्याआड ही ‘स्मगलिंग’ केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.केंद्रीय ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ६ डिसेंबर २०२३ राेजी नाेटिफिकेशन जारी करीत ७ डिसेंबर २०२३ पासून कांद्यावर निर्यातबंदी लावली. या निर्णयामुळे कांद्याचे दर ४५ रुपये प्रतिकिलाेवरून १२ रुपये प्रतिकिलाेपर्यंत खाली आले. विशिष्ट चवीमुळे जागतिक बाजारात भारतीय कांद्याला माेठी मागणी आहे. जगभरात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने दर वधारले आहेत.

भारतात कांद्याचे उत्पादन चांगले असताना कृषी विभागाच्या चुकीच्या रिपाेर्ट आधारे केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला.जागतिक बाजारातील कांद्याच्या चढ्या दरामुळे भारतीय ‘स्मगलर’ सक्रिय झाले. त्यांनी बटाटे, द्राक्ष व संत्रा निर्यात करीत असल्याचे सांगून कांद्याची ‘स्मगलिंग’ करायला सुरुवात केली. ही ‘स्मगलिंग’ २० दिवसांपासून सुरू आहे.

शुक्रवारी (दि. १९) श्रीलंकेतील बंदरात ३५, दुबईत १५ व मलेशियात १० कंटेनर भारतीय कांदा तेथील ‘कस्टम’ विभागाला आढळून आल्याने बिंग फुटले. त्या सर्व कंटेनरमध्ये दाेन ते पाच टक्के बटाटे व द्राक्ष आणि उर्वरित भारतीय कांदे हाेते. भारत-बांगलादेश सीमेवरील गाेजाडांगा येथे कांद्याने भरलेले आठ ट्रक पकडले. या ट्रकमध्ये थाेडा संत्रा व उर्वरित कांदे हाेते.कांदा निर्यातीचे दर (रुपयात)पाकिस्तान - १०५ रुपये/किलाे - १,२०० डाॅलर/टनचीन - ७० रुपये/किलाे - ५०० डाॅलर/टनहाॅलंड - ७० रुपये/किलाे - ९०० डाॅलर/टनइराण - ५४ रुपये/किलाे - ५०० डाॅलर/टन (अधिक ४० टक्के निर्यात शुल्क)चेन्नई, तुतिकाेरीन बंदरातून तस्करीकांद्याची ‘स्मगलिंग’ तामिळनाडूतील चेन्नई व तुतिकाेरीन बंदरातून केली जात आहे. एका कंटेनरमध्ये ३० टन कांदा पाठविला जाताे. विशेष म्हणजे, हे सर्व कंटेनर भारतीय कस्टम अधिकाऱ्यांनी तपासलेले असतात. मागील २० दिवसांत कस्टम अधिकाऱ्यांनी किती कंटेनर कांदा पाठविण्यास मूकसंमती दिली व त्यामागचे अर्थकारण असे, याचा अंदाज येताे. हा प्रकार उघड हाेताच हाॅर्टिकल्चर प्राेड्यूस एक्स्पाेर्ट असाेसिएशने शुक्रवारी डायरेक्टर जनरल ऑफ फाॅरेन ट्रेड यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

टॅग्स :कांदाबाजारतस्करीशेतकरी