Join us

Shetmal Awak: बाजारात शेतमालाची आवक का घटली; जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 15:30 IST

Shetmal Awak : राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त असून, याचा परिणाम कारंजा बाजार समितीसह इतर बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या आवकेवरही (Shetmal Awak) स्पष्टपणे दिसून येत आहे. वाचा सविस्तर

Shetmal Awak : राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त असून, याचा परिणाम कारंजा बाजार समितीसह इतर बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या आवकेवरही (Shetmal Awak) स्पष्टपणे दिसून येत आहे.

प्रखर उन्हामुळे शेतकरी शेतमाल आणण्यास टाळाटाळ करत असून, साठवून ठेवलेला माल केवळ अत्यावश्यकतेनुसारच विक्रीसाठी आणला जात आहे. विशेष बाब म्हणजे, सरासरी ५,००० क्विंटल असणारी सोयाबीनची आवकही केवळ ९५० क्विंटलवर आली आहे. (Shetmal Awak)

जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीसाठी साठविलेला शेतमाल एप्रिल ते मेदरम्यान विकतात. त्यामुळे या दिवसांतही बाजार समित्यांमध्ये चांगली आवक पाहायला मिळते. (Shetmal Awak)

विशेष करून, जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने इतर शेतमालापेक्षा सोयाबीनची आवक अधिक असते.

यंदा मात्र उन्हाच्या कडाक्याचा बाजार समित्यांवरही प्रभाव पाहायला मिळत आहे. मागील तीन दिवसांपूर्वी कारंजा बाजार समितीत २ हजार ८५० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

बुधवारी (३० एप्रिल) रोजी मात्र या ठिकाणी केवळ ९५० क्विंटल सोयाबीनचीच आवक झाली. इतरही शेतमालाची आवक (Shetmal Awak) तुलनात्मकदृष्ट्या घटल्याचे दिसले.

दरातील चढउताराचाही परिणाम!

* जिल्ह्यातील शेतकरी साठवून ठेवलेला शेतमाल खरिपाच्या तयारीसाठी विक्रीला काढत असतात.

* तथापि, आता उन्हाचा कडाका वाढल्याने शेतकरी आवश्यकतेनुसारच शेतमालाची विक्री करीत आहेत.

* त्यातही शेतमालाच्या दरातील चढ-उतार पाहूनच विक्रीचा निर्णय घेत असल्यानेही आवक कमी होत आहे.

६ हजार क्विंटल शेतमालाची आवक

कारंजा बाजार समितीत सोमवार (२८ एप्रिल) रोजी एकूण ५ हजार ९२५ क्विंटल शेतमालाची आवक झाली होती. यामध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा, तूर आणि सोयाबीनचे प्रमाण अधिक होते. बुधवार (३० एप्रिल) रोजी मात्र या बाजार समितीत केवळ २ हजार ६० क्विंटल शेतमालाचीच आवक झाली.

हे ही वाचा सविस्तर : Shetmal Kharedi: हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी का फिरवली पाठ ते जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसोयाबीनमकाहरभरा