Join us

Row Mango : शेतकऱ्यांसाठी यंदा कैरी होणार गोड; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:06 IST

Row Mango : मागील वर्षात पाऊस समाधानकारक झाल्यामुळे गावरान आंब्याचे (Gavran Mango) झाडे बहरली आहेत. परंतु परराज्यात कैरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आंब्याचे झाड (Gavran Mango) विकून चार पैसे पदरी पाडत आहेत. वाचा सविस्तर

युनूस नदाफ

अर्धापुर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कैरीची निर्यात वाढल्याने या वर्षात गावरान आंब्याचं (Gavran Mango) लोणचं आणि आमरस महागणार मात्र शेतकऱ्यांनी गावरान आंबा (Gavran Mango) विकून पैसे पदरात पाडून घेतले आहे. शेतकऱ्यांसाठी कैरी गोड झाली आहे.

मागील वर्षात पाऊस समाधानकारक झाल्यामुळे गावरान आंब्याचे झाडे बहरली आहेत. परंतु परराज्यात कैरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आंब्याचे झाड विकून चार पैसे कमवत आहेत. (Gavran Mango)

एक झाड पाच हजार ते पंधरा हजार पर्यंत विकला जात आहे. कैरी असतानाच आंबे तोडला जात असल्याने लोणचं महाग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच गावरान आंब्याचा आमरस सुद्धा महाग होऊ शकतो. (Gavran Mango)

सध्या बाजारपेठेत कैरीला सुरुवातीला ८० ते ७० रुपये प्रति किलो प्रमाणे विकला गेला आहे. तर सध्या ४० ते ३० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. अनेक शेतकरी कैरी अवस्थेत असताना आंब्याचे झाड विकत आहेत. म्हणूनच यंदा गावरान आंब्याचे लोणचं महाग होऊ शकतो.

आंबा उत्पादकांना आर्थिक मदत करण्यासाठी गावरान आंबा चांगला पर्याय आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांसाठी घातक ठरू लागला आहे. यामुळे कैरी असतानाच आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे .

मोठ्या शहरात कैरीला मागणी दर ही चांगला

* अर्धापुर तालुक्यात व्यापारी मोठ्या प्रमाणात इंदोर, अकोला, यवतमाळ, पुणे, मुंबई आदी मोठ्या शहरात कैरीची निर्यात सुरू आहे. तसेच या शहरातील बाजारपेठेत कैरीला मागणी असल्याने आणि चांगला दर ही मिळत आहे.

* वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी कैरी असतानाच आंब्याची विक्री करून चार पैसे पदरात पाडून घेत आहेत.

* उन्हाळ्याच्या दिवसांत वानरांना खाण्यासाठी काही राहत नाही तेव्हा वानर आंब्याच्या झाडाकडे मोर्चा वळतात झाडावरच बसून राहतात यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. म्हणून शेतकरी कैरी आली की, आंब्याचे झाड व्यापाऱ्याला विकत आहेत.

लोणचं तयार करण्यासाठी आणखी दीड ते दोन महिन्याचा वेळ असून वानर झाड्यावर आंबे खाऊन घेत आहेत. ७ हजार रुपयाला आंबा विकला आहे. - बाबूमियाँ नदाफ, आंबा उत्पादक, शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Cotton Market Update : पांढऱ्या सोन्याला मिळाली झळाळी; 'या' बाजारात मिळाला उच्चांकी दर वाचा सविस्तर

टॅग्स :कृषी योजनाआंबाशेती क्षेत्रशेतकरीशेती