रोजच्या स्वयंपाकातील आणि हॉटेलमधील पदार्थांना झणझणीत ठसक्याची चव देणारी लाल मिरची यंदा बाजारात देखील भाव खात आहे. परतीच्या पावसाचा फटका आणि हवामानातील बदलामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.
परिणामी, बाजारात आवक कमी झाली असून, दर झपाट्याने वाढले आहेत. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या प्रमुख उत्पादक राज्यांत अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले.
आंध्र प्रदेशातील गुंटूर व खमाम, तेलंगणातील वारंगल, तसेच कर्नाटकातील खंडगी व हुबळी येथे देशातील प्रमुख मिरची बाजार भरतात. येथून देशांतर्गत, तसेच अमेरिका, चीन आदी देशांत निर्यात केली जाते.
दररोज सुमारे ६ ते ७ लाख गोण्या मिरचीची उलाढाल होत असते. मात्र, यंदा ही आवक मात्र जवळपास निम्म्यावर आल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी दर तेजीत आहे.
किरकोळ बाजारातील मिरचीचे 'भाव' काय?
| प्रकार | २०२५ | २०२६ (प्र. क्विं.) |
| बेडगी | ३८० ते ४०० | ५०० ते ५५० |
| चपाटा | २०० ते २५० | ४५० ते ५०० |
| रसगुल्ला | ३०० ते ३५० | ५०० ते ५५० |
| सी ५ | १५० ते २०० | ३०० ते ३५० |
Web Summary : Red chili prices are rising due to lower production caused by unseasonal rains in key producing states like Telangana and Andhra Pradesh. Market arrivals have halved, impacting domestic and export markets. Bedgi chili prices range from ₹500-550/quintal.
Web Summary : तेलंगाना और आंध्र प्रदेश जैसे प्रमुख उत्पादक राज्यों में बेमौसम बारिश के कारण लाल मिर्च का उत्पादन कम होने से कीमतें बढ़ रही हैं। बाजार में आवक आधी हो गई है, जिससे घरेलू और निर्यात बाजार प्रभावित हुए हैं। बेडगी मिर्च की कीमतें ₹500-550/क्विंटल हैं।