Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाल मिरचीच्या दरात दुपटीने वाढ, मसालेही खाता आहेत भाव; वाचा किलोला किती रुपये दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 11:59 IST

lal mirchi bajar bhav मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीचा हंगाम सुरू झाला आहे. प्रतिदिन १०० टन पेक्षा जास्त आवक होत आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीचा हंगाम सुरू झाला आहे. प्रतिदिन १०० टन पेक्षा जास्त आवक होत आहे.

यावर्षी उत्पादन कमी झाले असल्यामुळे बाजारभाव पुन्हा वाढले आहेत. मिरची बरोबर मसालेही भाव खाऊ लागले असल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फोडणी बसू लागली आहे.

उन्हाचा पारा वाढल्यापासून नवी मुंबईमधील डंकांवरही मिरची पावडर करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्ये आंध्रप्रदेश, कर्नाटकमधून मिरची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.

गुजरात, महाराष्ट्र व इतर राज्यातील मिरचीची आवक यावर्षी जास्त होत नाही. उत्पादन कमी असल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत.

गतवर्षी १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जाणारी बेडगी मिरची आता ४०० ते ५०० रुपये किलो दराने विकली जात आहे.

काश्मिरी मिरचीचे दर २०० ते ३०० वरून ६०० ते ७५० रुपयांवर पोहचले आहेत. मिरचीबरोबर मसाल्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

मुंबई बाजार समितीमधील मिरची, मसाल्यांचे भाव
मसाल्याचा प्रकार - प्रतिकिलो दर

बेडगी मिरची - ४०० ते ४५०
कश्मिरी मिरची - ६०० ते ७५०
तेजा - २२० ते २४०
बडीशेप - ११० ते २६०
सुंठ - ३१० ते ४६५
धने - ९० ते १२०
धने पावडर - २१० ते २४०
हळकुंड - १८५ ते २३०
हळद - २१० ते २४०
जीरा - २०० ते ३२५
शहाजिरे - २०० ते ९५०
मोहरी - ६५ ते २५
हिरवी वेलची - १४०० ते २,४००
वेलची मसाला - १२०० ते १,८५०
दगडफूल - २७५ ते ५०५
धनाडाळ - १७५ ते १९०
लवंग - ७०० ते २५०
लवंग पत्ता - २८ ते ४७
काळीमिरी - ६०० ते ८५०
तेजपत्ता - २९ ते ७०
चक्रीफुल - २९५ ते ६०५
दालचिनी - ४५० ते ७५०
जायफळ - ६५० ते १,१००

अधिक वाचा: Maharashtra Weather Update : तापमान काही अंशी घसरले; पुढील तीन दिवसात राज्यात काय आहे पावसाचा अंदाज?

English
हिंदी सारांश
Web Title : Red Chili Prices Double, Spices Also Rise: Price Per Kilo?

Web Summary : Red chili prices have doubled due to low production, impacting household budgets. Bedgi chilies now cost ₹400-₹500/kg, Kashmiri chilies ₹600-₹750/kg. Spice prices have also increased, with black pepper reaching ₹850/kg and green cardamom topping ₹2,400/kg in Mumbai market.
टॅग्स :मिरचीबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमुंबईगुजरातमहाराष्ट्र