नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीचा हंगाम सुरू झाला आहे. प्रतिदिन १०० टन पेक्षा जास्त आवक होत आहे.
यावर्षी उत्पादन कमी झाले असल्यामुळे बाजारभाव पुन्हा वाढले आहेत. मिरची बरोबर मसालेही भाव खाऊ लागले असल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फोडणी बसू लागली आहे.
उन्हाचा पारा वाढल्यापासून नवी मुंबईमधील डंकांवरही मिरची पावडर करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्ये आंध्रप्रदेश, कर्नाटकमधून मिरची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
गुजरात, महाराष्ट्र व इतर राज्यातील मिरचीची आवक यावर्षी जास्त होत नाही. उत्पादन कमी असल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत.
गतवर्षी १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जाणारी बेडगी मिरची आता ४०० ते ५०० रुपये किलो दराने विकली जात आहे.
काश्मिरी मिरचीचे दर २०० ते ३०० वरून ६०० ते ७५० रुपयांवर पोहचले आहेत. मिरचीबरोबर मसाल्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे.
मुंबई बाजार समितीमधील मिरची, मसाल्यांचे भावमसाल्याचा प्रकार - प्रतिकिलो दरबेडगी मिरची - ४०० ते ४५०कश्मिरी मिरची - ६०० ते ७५०तेजा - २२० ते २४०बडीशेप - ११० ते २६०सुंठ - ३१० ते ४६५धने - ९० ते १२०धने पावडर - २१० ते २४०हळकुंड - १८५ ते २३०हळद - २१० ते २४०जीरा - २०० ते ३२५शहाजिरे - २०० ते ९५०मोहरी - ६५ ते २५हिरवी वेलची - १४०० ते २,४००वेलची मसाला - १२०० ते १,८५०दगडफूल - २७५ ते ५०५धनाडाळ - १७५ ते १९०लवंग - ७०० ते २५०लवंग पत्ता - २८ ते ४७काळीमिरी - ६०० ते ८५०तेजपत्ता - २९ ते ७०चक्रीफुल - २९५ ते ६०५दालचिनी - ४५० ते ७५०जायफळ - ६५० ते १,१००
अधिक वाचा: Maharashtra Weather Update : तापमान काही अंशी घसरले; पुढील तीन दिवसात राज्यात काय आहे पावसाचा अंदाज?
Web Summary : Red chili prices have doubled due to low production, impacting household budgets. Bedgi chilies now cost ₹400-₹500/kg, Kashmiri chilies ₹600-₹750/kg. Spice prices have also increased, with black pepper reaching ₹850/kg and green cardamom topping ₹2,400/kg in Mumbai market.
Web Summary : उत्पादन कम होने से लाल मिर्च के दाम दोगुने हो गए हैं, जिससे घरेलू बजट पर असर पड़ रहा है। बेडगी मिर्च अब ₹400-₹500/किलो और कश्मीरी मिर्च ₹600-₹750/किलो है। मुंबई बाजार में मसालों के दाम भी बढ़े हैं, काली मिर्च ₹850/किलो और हरी इलायची ₹2,400/किलो तक पहुंच गई है।