Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > नारायणगाव बाजारसमितीत ६० हजार कोथिंबीर जुड्या का फेकून दिल्या?

नारायणगाव बाजारसमितीत ६० हजार कोथिंबीर जुड्या का फेकून दिल्या?

rate issue with coriander in Narayangaon Market yard | नारायणगाव बाजारसमितीत ६० हजार कोथिंबीर जुड्या का फेकून दिल्या?

नारायणगाव बाजारसमितीत ६० हजार कोथिंबीर जुड्या का फेकून दिल्या?

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात पडलेल्या ५० ते ६० हजार कोथिंबीर आणि मेथीच्या जुड्या फेकून देण्यात आल्या.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात पडलेल्या ५० ते ६० हजार कोथिंबीर आणि मेथीच्या जुड्या फेकून देण्यात आल्या.

टोमॅटोने शेतकऱ्यांना मालामाल केले तर कोथिंबीर आणि मेथीने शेतकऱ्यांचे हाल केले. कोथिंबीर आणि मेथीची अचानक आवक वाढल्याने आणि त्यातच पावसामुळे मागणी घटल्याने कोथिंबीर जोडी ५० पैसे तर मेथीची जुडी १ रुपया दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात पडलेल्या ५० ते ६० हजार कोथिंबीर आणि मेथीच्या जुड्या फेकून देण्यात आल्या.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात शनिवारी (दि. झाली. २९) कोथिंबीर, मेथी आणि शेपूची एकूण ३ लाख २५ हजार १०० जुडींची आवक झाली. यामध्ये कोथिंबीरची १ लाख ४९ हजार १०० जुड्यांची आवक होऊन कोथिंबीरच्या शेकडा जुडीला ५१ रुपये ते १८०१ रुपये, मेथीची १ लाख ६२ हजार ६०० जुड्यांची आवक झाली. मेथीला शेकडा बाजारभाव १०१ ते ९०१ रुपये मिळाला तर शेपूची १३ हजार ४०० जुड्यांची आवक झाली. शेपूला शेकडा जुडी ३०१ ते १२०१ रुपये बाजारभाव मिळाला.

पावसामुळे भाजीपाल्याची मागणी कमी
नारायणगाव उपबाजार केंद्रात एकूण ३ लाख २५ हजार १०० जुड्यांची जादा प्रमाणात आवक झाली. व्यापाऱ्यांनी कोथिंबीर, मेथी आणि शेपूची खरेदी केली. मात्र, भाजीपाल्याचा मोठा खरेदीदार असलेल्या मुंबईमध्ये सतत पाऊस असल्याने भाजीपाल्याची मागणी कमी झाल्याने व्यापायांनी खरेदी केलेला भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली. व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केल्याने बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली कोथिंबीर आणि मेथी बाजार समिती आवारातच फेकून दिली. काही दिवसापुर्वीच मेथी आणि कोथिंबीरचे भाव पन्नाच रुपयापर्यंत कडाडले होते.

Web Title: rate issue with coriander in Narayangaon Market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.