बार्शी : बार्शी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर, सोयाबीन, ज्वारी सोबतच रब्बी हंगामातील राजमा पिकाची आवक सुरू झाली.
बाजारात ५०० कट्टे राजमा पिकाची आवक सोमवारी झाली. या राजमाला ६ हजार ४०० रुपयांपासून ८ हजार ५०० ते ९ हजार रुपये क्विंटल असा दर मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे म्हणाले की, गेल्या तीन-चार वर्षापासून उत्तर बार्शीच्या काही भागासह कळंब, भूम आदी भागात राजमा पिकाची लागवड वाढलेली आहे. मागील चार-पाच दिवसांपासून राजमाची आवक वाढत आहे.
बाजारातील मालाची आवक आणि दर
ज्वारी ११०० कट्टे - २ हजार ते ४ हजार,
पांढरी तूर ५५०० कट्टे - ४ हजार ६०० ते ७ हजार ३००
तांबडी तूर २०० कट्टे - ६ हजार ४०० - ६ हजार ९०० ते ७ हजार २००
सोयाबीन ३ हजार कट्टे - ३ हजार ६०० - ३ हजार ८०० ते ४ हजार १००
या सोबतच मका, गहू, हरभरा, चवळी आदी पिकांची कमी अधिक आवक होत आहे. कडब्याची ३१ वाहने आवक असून ६७५ पासून १०३२ रुपये क्विंटल दर मिळत आहे.
अधिक वाचा: Us Todani Yantra Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदीस मुदतवाढ