lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > नवीन हरभरा विकण्यासाठी राज्यातील बाजारसमित्यांच्या प्रांगणात वाहनांच्या रांगा, काय मिळतोय भाव?

नवीन हरभरा विकण्यासाठी राज्यातील बाजारसमित्यांच्या प्रांगणात वाहनांच्या रांगा, काय मिळतोय भाव?

Queues of vehicles in the premises of market committees in the state to sell new gram, what is the price? | नवीन हरभरा विकण्यासाठी राज्यातील बाजारसमित्यांच्या प्रांगणात वाहनांच्या रांगा, काय मिळतोय भाव?

नवीन हरभरा विकण्यासाठी राज्यातील बाजारसमित्यांच्या प्रांगणात वाहनांच्या रांगा, काय मिळतोय भाव?

हरभरा उतरवायला जागा मिळेना, या बाजारसमितीत हरभरा असणारी वाहने आज स्विकारली जाणार नसल्याची माहिती...

हरभरा उतरवायला जागा मिळेना, या बाजारसमितीत हरभरा असणारी वाहने आज स्विकारली जाणार नसल्याची माहिती...

शेअर :

Join us
Join usNext

रब्बीतील हरभरा काढणीस सुरुवात झाली असून नवीन हरभराबाजारपेठेत दाखल होत आहे. मागील  दोन दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये साधारण १ लाख क्विंटल हरभऱ्याची विक्रमी आवक होत आहे. बाजारसमितीत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले.हरभऱ्याला क्विंटलमागे सर्वसाधारण ५५०० ते ७२०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत असून शेतकऱ्यांचा विक्रीकडे कल वाढला आहे.

दरम्यान, काल हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने अकोला बाजार समितीच्या प्रांगणात हरभरा उतरवण्यासही जागा उरली नाही. परिणामी आज  आज दि ६ मार्च रोजी हरभऱ्याची वाहने बाजार समित्यांमध्ये स्विकारली जाणार नसल्याची माहिती आहे. बाजार समिती प्रशासनाद्वारे अडत्यांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.

   

आज दिनांक ६ मार्च रोजी १८ हजार ८५४ क्विंटल हरभऱ्याची आवक राज्यभरातल्या बाजार समित्यांमध्ये सकाळच्या सत्रात झाली. लोकल, काट्या, लाल, गरडा, चाफा वाणाचा हरभरा बाजारपेठेत शेतकरी घेऊन येत आहेत. क्विंटलमागे  ५८०० ते ७००० रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे.

जाणून घ्या कोणत्या बाजारसमितीत काय मिळतोय भाव..

जिल्हाआवककमीत कमी दरसर्वसाधारण दर
अमरावती1219355005800
छत्रपती संभाजीनगर554455445
धाराशिव6054005500
धुळे11868057195
हिंगोली8554505525
मंबई126158007200
नागपूर442650005518
पुणे3863006700
सांगली1954005550
सोलापूर8656005975
सोलापूर3355005530
यवतमाळ29053355355
यवतमाळ24054005500

Web Title: Queues of vehicles in the premises of market committees in the state to sell new gram, what is the price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.