Join us

Pigeon Pea Market Rate : राज्यात तुरीला काय मिळतोय दर? वाचा आजचे तूर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 18:46 IST

Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.०१) रोजी एकूण १३४८ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात ८७२ क्विंटल लाल, २८ क्विंटल लोकल तर ६८ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. 

राज्यात आज सोमवार (दि.०१) रोजी एकूण १३४८ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात ८७२ क्विंटल लाल, २८ क्विंटल लोकल तर ६८ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. 

लाल तुरीला आज सर्वाधिक आवकेच्या अकोला बाजारात कमीत कमी ६००० तर सरासरी ६३५० रुपयांचा दर मिळाला. तसेच मालेगाव येथे ५४२०, अमळनेर येथे ५५००, चाळीसगाव येथे ५६०१, पाचोरा येथे ६०५०, सावनेर येथे ६२०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

लोकल वाणाच्या तुरीला आज काटोल येथे ६००० तर पांढऱ्या तुरीला कर्जत (अहिल्यानगर) येथे ६५०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. याशिवाय मोर्शी येथे आज ३८० क्विंटल तुरीच्या आवकेस कमीत कमी ५८०० तर सरासरी ६०८५ रुपयांच्या प्रती क्विंटल दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील तूर आवक व दर    

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/09/2025
मोर्शी---क्विंटल380580063706085
अकोलालालक्विंटल565600065306350
मालेगावलालक्विंटल20239955005420
अमळनेरलालक्विंटल7450055005500
चाळीसगावलालक्विंटल25420157905601
पाचोरालालक्विंटल45605060506050
सावनेरलालक्विंटल210607463196200
काटोललोकलक्विंटल28600061916000
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल68650065006500

हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र 

टॅग्स :तूरशेतकरीबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेती क्षेत्र