Join us

सांगलीत पणनची हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 9:08 AM

पणन विभागाकडून केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हरभरा खरेदी करण्यात येणार आहे. हरभरा खरेदीकरिता शासनाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांची एनईएमएल पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी दि. २८ मार्चपासून सुरू आहे.

जिल्ह्यात पणन विभागाकडून केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हरभरा खरेदी करण्यात येणार आहे.

हरभरा खरेदीकरिता शासनाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांची एनईएमएल पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी दि. २८ मार्चपासून सुरू आहे.

नोंदणी असणाऱ्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी सी. डी. खाडे यांनी दिली आहे.

खाडे म्हणाले, जिल्ह्यात विष्णुअण्णा खरेदी विक्री-संघ सांगली आणि अॅड. आर. आर. पाटील शेतकरी खरेदी-विक्री संघ, तासगाव या खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

किमान आधारभूत किंमत योजनेनुसार ज्या शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्री करावयाची आहे, अशा शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

केंद्र शासनाने हरभरा या पिकाकरिता प्रति क्विंटल ५ हजार ४४० रुपये दर निश्चित केला आहे.

टॅग्स :हरभराशेतकरीपीकबाजारसांगलीमार्केट यार्डकेंद्र सरकार