Join us

कांदा बाजारभाव जैसे थे; आर्थिक संकटांमुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव करावी लागतेय विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:09 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असली तरी भाव समाधानकारक नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत.

महेश घोलपओतूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असली तरी भाव समाधानकारक नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत.

कांद्यामुळे आजघडीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. निर्यात बंदी शुल्क हटल्यावर बाजारभाव वाढेल, अशी आशा होती. मात्र आजघडीला कांदा केवळ १० ते १३ रुपये किलोच्या दरम्यान विकत असल्याने या आशेवरही आता पाणी फिरताना दिसत आहे.

ओतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उपबाजार येथे सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. रब्बी हंगामात इतर पिकांपेक्षा कांद्यातून चार पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; मात्र कांद्याला भाव न वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सध्या बाजार समितीत सुमारे अडीशचे ते चारशे रुपये प्रतिक्विंटल दर कांद्याला मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्च काढणेही कठीण झाले आहे. कांद्याची प्रत उत्तम असली तरी दर नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे.

गेल्या दीड महिन्यापासून कांद्याचे दर स्थिर आहेत. कांदा आवक सुरु आहे. बाजारभाव कमी असल्याने कांदा उत्पादकांचा पुरता वांदा झाल्याने शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठविणे पसंत केले आहे.

काही शेतकऱ्यांना पुढील पिकाच्या भांडवली खर्चासाठी नाईलाजास्तव निराश होऊन कांद्याची विक्री करावी लागत आहे. कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी आर्त हाक शेतकरी शासनाला देत आहेत.

आजघडीला कांदा केवळ १० ते १३ रुपये किलोच्या दरम्यान विकत असल्याने या आशेवरही आता पाणी फिरताना दिसत आहे. उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. कांदा आजघडीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर २० टक्के शुल्क लादले होते; परंतु शेतकऱ्यांच्या विरोधानंतर एक एप्रिलपासून हे शुल्क हटवण्यात आले. त्यानंतर बाजारभाव वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती, मात्र एक एप्रिलपासून आजपर्यंत बाजारभाव जैसे थे आहेत. - सदाशिव केदारी, कांदा उत्पादक शेतकरी

२० ते २६ रुपये किलोला फेब्रुवारीमध्ये बाजारभाव होते ते टिकून राहतील असे सर्वच शेतकऱ्यांना वाटले होते; पण बाजारभाव कमी होऊन ते १४ ते १५ रुपयांवर आले. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवणुकीवर भर दिला. आज बाजार येतील उद्या येतील हीच अपेक्षा शेतकऱ्याला आहे. - पांडुरंग ढोबळे, प्रगतिशील शेतकरी 

अधिक वाचा: Jamin Mojani : जमीन मोजणी केल्यानंतर ती मान्य नसल्यास आता आला हा नवीन निर्णय; वाचा सविस्तर

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीकाढणीसरकारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकेंद्र सरकार