Join us

Onion, Garlic Market : जुना कांदा व लसूणाला मागणी अधिक ; किरकोळ बाजारात काय मिळतोय भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 11:12 IST

बाजारपेठेत सध्या जुना कांदा, लसूणाला भाव खात आहे. (Onion Garlic Market)

Onion Garlic Market :

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडत आहेत. यात महागाईचा मुद्दा पाठीमागे पडला आहे. या धामधुमीत बाजारपेठेत मात्र जुना कांदा ८० रुपये किलो, तर गावरान लसूण ६०० रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचला आहे.

जुन्या कांद्याला का आला भाव?

सध्या भाजीमंडईत उन्हाळी जुना कांदा व पावसाळी नवीन कांदा विक्रीला उपलब्ध आहे. यातील काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने नवीन कांदा खराब झाला. तसेच काहीजण चंपाषष्टीपर्यंत नवीन कांदा खात नाहीत. दुसरी बाजू म्हणजे निवडणुकीत कार्यकर्त्यांच्याजेवणावळी सुरू आहेत. त्यामुळे जुन्या कांद्याला मागणी वाढली आहे.शहरात भाजीमंडईत जुना कांदा ८० रुपये किलो विकला जात आहे, तर नवीन कांदा ५० ते ६० रुपये किलोने मिळत आहे, अशी माहिती विक्रेता संजय वाघमारे यांनी दिली.

महाग तरी गावरानच लसूण हवा

मागील २ ते ३ वर्षे लसणाला भावच नव्हता. ५० रुपये किलोत लसूण मिळत होता. मात्र, यंदा लसणाला भाव चढला आहे. कारण, नवीन लसूण येण्यासाठी मार्च महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. यामुळे नवीन लसूण ६०० रुपये किलोने विक्री होत आहे.हायब्रीड लसूण ४०० ते ५०० रुपये किलोने मिळत आहे. हायब्रीड लसूण गावरानपेक्षा स्वस्त असला तरी गावरानची चव त्यास येत नाही. यामुळे गावरान लसूण हवा, असे ग्राहक म्हणत आहेत.

छत्रपती संभाजीनगरच्या बाजार समितीमध्ये काय मिळाले दर

बाजार समिती: छत्रपती संभाजीनगर

दर प्रती युनिट (रु.)

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/11/2024
सफरचंद---क्विंटल91280001300010500
आवळा---क्विंटल12160024002000
बाजरी---क्विंटल44258430792832
कारली---क्विंटल18240030002700
बोर---क्विंटल20300035003250
दुधी भोपळा---क्विंटल25100018001400
वांगी---क्विंटल13140023001850
कोबी----क्विंटल36140026002000
ढोवळी मिरची---क्विंटल25200045003250
गाजर---क्विंटल23350040003750
चवळी (शेंगा)---क्विंटल17250040003250
चिकु---क्विंटल8500070006000
गवार---क्विंटल22500060005500
कोथिंबिर---नग17100500700600
काकडी---क्विंटल477001000850
सिताफळ---क्विंटल36140032002300
अंजीर---क्विंटल5600080007000
फ्लॉवर---क्विंटल30250035003000
आले---क्विंटल17200060004000
हरभरागरडाक्विंटल5450164255463
मिरची (हिरवी)---क्विंटल79160030002300
वाटाणा---क्विंटल17600070006500
पेरु---क्विंटल706001300950
भेडी---क्विंटल34250030002750
लिंबू---क्विंटल19250035003000
मकापिवळीक्विंटल2137154520201782
मका (कणीस)---क्विंटल2137154520201782
कैरी---क्विंटल40300035003250
मेथी भाजी---नग8100100015001250
मोसंबी---क्विंटल16220052003700
कांदा---क्विंटल77940025001450
संत्री---क्विंटल20150035002500
पपई---क्विंटल255001100800
डाळींब---क्विंटल30130082004750
बटाटा---क्विंटल1280200025002250
दोडका (शिराळी)---क्विंटल20300035003250
शहाळे---नग27000260032002900
शेवगा---क्विंटल75000110008000
ज्वारीशाळूक्विंटल2220122012201
सोयाबिन---क्विंटल230370041213910
पालक---नग13000300500400
टोमॅटो---क्विंटल69100035002250
वाल भाजी---क्विंटल24150030002250

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रकांदाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड