Join us

नवे सोयाबीन पंधरा दिवसांत येणार दर मात्र जमिनीवरच; हमीभावाचे वरातीमागून घोडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 16:27 IST

मागील दोन वर्षांत सोयाबीनचा विक्री दर वाढला नाही. हमीभाव तर सोडा, त्याहीपेक्षा कमी दराने सोयाबीनची विक्री झाली. मात्र, सरकारने हस्तक्षेप केला नाही.

खाद्यतेल तसेच पशुखाद्य वापरात वाढ झाली असली तरी सोयाबीनचा विक्री दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. वर्षभर सोयाबीनचाबाजार जमिनीवरच असल्याने शेतकरी नव्याने सोयाबीन पीक घेण्यास आनंदी नाही.

मात्र, पीक तर घ्यावेच लागेल म्हणून सोयाबीन घेतले जाते. सोयाबीन बाजारात आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी हमीभाव केंद्रावर नोंदणी सुरू होते.

मागील दोन वर्षांत सोयाबीनचा विक्री दर वाढला नाही. हमीभाव तर सोडा, त्याहीपेक्षा कमी दराने सोयाबीनची विक्री झाली. मात्र, सरकारने हस्तक्षेप केला नाही.

म्हणजे, हमीभाव केंद्रावर तातडीने खरेदी सुरू केले जात नाहीत. याचा फटका थेट उत्पादक घटक म्हणून शेतकऱ्यांना बसतो.

बाजारात सोयाबीनच्या तेलाचा दर मागील दोन वर्षात वाढला असताना सोयाबीन विक्री दरात झालेली नाही. त्यामुळेच सोयाबीन पेरणी क्षेत्रातही वाढ झालेली नाही.

सोयाबीन चार हजारांखाली◼️ शेतकरी सोयाबीन न परवडणाऱ्या दरात विक्री करीत आहे. कारण, दरवाढीची शक्यता नाही. सध्या सोयाबीनचे पीक काढणीची वेळ आली असली तरी दरात वाढ होताना दिसत नाही. हेच दर मागील चार-पाच वर्षांपासून आहेत.◼️ एकीकडे उत्पादन खर्च वाढला असताना विक्री दर मात्र वाढत नाहीत. मागील एक-दोन वर्षांत सोयाबीनचा दर ३८०० ते ४२०० रुपये मिळत आहे.◼️ शासनाचा मागील वर्षाचा हमीभाव ४,८९२ रुपये होता. तर या वर्षीसाठी ५,३२८ रुपये इतका आहे. हमी भावापेक्षा कमी दर बाजारात सोयाबीनला मिळत आहे.

हमीभावाचे वरातीमागून घोडे◼️ केंद्र शासनाने यंदासाठी सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ३२८ रुपये केला असला तरी सध्या बाजारात एक हजार रुपये व त्यापेक्षा कमी दर मिळत आहे.◼️ आता कोणतेही धान्य हमीभावाने विक्री करायचे असेल तर पिकांची ई-पीक नोंद आवश्यक आहे.◼️ मागील दोन-तीन वर्षांत दरवाढीची अपेक्षा करीत सोयाबीन घरात ठेवले; मात्र दरवाढ होत नसल्याने मिळेल त्या दराने विक्री करावे लागले.◼️ यंदा पाऊस लवकर पडल्याने जून व जुलै महिन्यात खरिपाची पेरणी झाली. आता काढणीही लवकर सुरू होईल. मात्र, हमीभाव केंद्र गरज पडली तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच सुरू होतात.

या वर्षीचे सोयाबीन बाजारात विक्रीला येण्यासाठी पंधरा दिवस लागतील. मागील वर्षाएवढीच सोयाबीनची याही वर्षी पेरणी झाली आहे. सोयाबीन पट्टयात भरपूर पाऊस पडल्याने उताऱ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे असले तरी एकरी उतारा किती पडतो, यावर उत्पादन अवलंबून आहे.

अधिक वाचा: महसूल विभाग १७ ते २२ सप्टेंबरमध्ये शेतरस्त्यासाठी विशेष मोहीम राबवणार; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :सोयाबीनशेतकरीशेतीपीकबाजारमार्केट यार्ड