Join us

Nagpur Santra Market : पंजाबच्या किनू संत्र्याला नागपुरी संत्रा देतोय टक्कर, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 20:56 IST

Nagpur Santra Market : नागपूरच्या संत्र्याची (Nagpur Santra) आवक वाढताच किनू संत्र्याच्या मागणीत घट झाली आहे.

गडचिरोली : पंजाब राज्यात प्रसिध्द असलेल्या किनू संत्र्याचा (Kinu Santra) तीन आठवडे बोलबाला होता. मात्र, नागपूरच्या संत्र्याची (Nagpur Santra) आवक वाढताच किनू संत्र्याच्या मागणीत घट झाली असून, दरही पडले आहेत. सध्या गुजरीमधील फळविक्रेत्यांकडे नागपुरी संत्र्याची आवक वाढल्यामुळे संत्रा ६० ते ८० रुपये किलोप्रमाणे विकले जात आहे. 

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बाजारातनागपूरच्या संत्र्याची (Nagpur Santra Market) आवक वाढली आहे. त्यामुळे संत्र्याच्या दरात घसरण झाले आहे. बाजारपेठेत उन्हाळ्यातील मार्च, एप्रिल महिन्यात पंजाबमधील किनू संत्रा बाजारपेठेमध्ये येतो. याचे दर सुरुवातीला १२० रुपये किलोप्रमाणे असतो, तर नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यातील नागपुरी संत्री बाजारात भरपूर येत असल्याने दर ६० रुपये किलोने विकली जाते. 

नागपुरी संत्र्याची आवक वाढल्यामुळे संत्र्याचे दर कमी झाले आहेत. परंतु, ग्राहकांना उन्हाळ्यातील पंजाबमधील किनू संत्रापेक्षा नागपुरी संत्र्याला जास्त पसंती आहे. त्यामुळे ग्राहक नागपुरी संत्रा खरेदी करत आहेत. - फैजान सय्यद, फळ विक्रेते, कोरची

संत्रा ठरतो आरोग्यदायी संत्रा सेवनामुळे शरीराला अनेक फायदे आहेत. संत्रा हा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी व अन्य पोषक तत्वे आहेत. शिवाय संत्राच्या सालीच पावडर त्वचेसाठी फायदेशीर आहे. पोटात गॅस, उच्च रक्तदाब, स्नायूचे वेदना, जुलाब यासाठी संत्रा आरोग्यदायी आहे. त्यामुळे थंडीमध्ये नागरिकांनी याचे सेवन केले तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवून निरोगी ठेवते. 

आज काय भाव मिळाला? संत्र्याला नाशिक मार्केटमध्ये कमीत कमी 3500 रुपये, तर सरासरी 3500 दर क्विंटल मागे मिळतो आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये सरासरी 2750 रुपये तर पुणे बाजारात 3200 दर मिळतो आहे. दुसरीकडे मुंबई फ्रुट मार्केटमध्ये सरासरी 04 हजार 250 रुपये असा सर्वाधिक दर मिळतो आहे. तसेच राज्यातील बाजार समितीचा विचार करता कमीत कमी 1750 रुपयांपासून ते 4250 रुपयांपर्यंत दर मिळतो आहे.

टॅग्स :मार्केट यार्डशेती क्षेत्रबाजारनागपूर