Lokmat Agro >बाजारहाट > कडधान्य व तेलबियांची आधारभूत किंमतीनुसार खरेदी करण्यासाठी नाफेडने केले 'हे' महत्वाचे आवाहन

कडधान्य व तेलबियांची आधारभूत किंमतीनुसार खरेदी करण्यासाठी नाफेडने केले 'हे' महत्वाचे आवाहन

NAFED makes 'this' important appeal to purchase pulses and oilseeds at support price | कडधान्य व तेलबियांची आधारभूत किंमतीनुसार खरेदी करण्यासाठी नाफेडने केले 'हे' महत्वाचे आवाहन

कडधान्य व तेलबियांची आधारभूत किंमतीनुसार खरेदी करण्यासाठी नाफेडने केले 'हे' महत्वाचे आवाहन

हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची (मूग, उडीद, सोयाबीन व तूर) खरेदी करण्यात येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी.

असे आवाहन दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन लिमिटेडचे सरव्यवस्थापक (नाफेड खरेदी) डी. आर. भोकरे यांनी केले आहे.

हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची (मूग, उडीद, सोयाबीन व तूर) खरेदी करण्यात येणार आहे.

आधारभूत दराने खरेदी करण्याकरिता ई-पिक पाहणी असलेला सातबारा उतारा आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनी सर्वच दृष्टीने महत्वाची असणारी ई-पिक पाहणी लवकरात लवकर करून घ्यावी

तसेच खरेदी प्रक्रिया ही शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार असल्याचे पणन महासंघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक वाचा: e Pik Pahani : ई-पीक पाहणीचे नवीन अपडेटेड मोबाईल अ‍ॅप वापरून कशी कराल पिकांची नोंद?

Web Title: NAFED makes 'this' important appeal to purchase pulses and oilseeds at support price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.