Join us

Nafed Harbhara Kharedi: 'या' कारणामुळे शेतकऱ्यांनी हरभरा हमीभाव केंद्राकडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 15:14 IST

Nafed Harbhara Kharedi: राज्य शासनाने हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु केली. परंतु शेतकरी हरभरा हमीभाव केंद्रात विक्री करण्यासाठी यंदा उत्सुक दिसत नाही. जाणून घ्या काय आहे कारण सविस्तर (Nafed Harbhara Kharedi)

Nafed Harbhara Kharedi: राज्य शासनाने हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु केली. परंतु शेतकरीहरभरा हमीभाव केंद्रात विक्री करण्यासाठी यंदा उत्सुक दिसत नाही. (Nafed Harbhara Kharedi)

रब्बी हंगामातील अर्धा हरभरा बाजारात विक्री झाल्यानंतर 'नाफेड'ने नोंदणी सुरू केली आहे. नोंदणीलाही अनेक अटींसह चाळणी व गाळणी असल्याने तसेच चुकाऱ्याच्या पावत्या एकेक महिना मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी हमीभावाच्या नोंदणीकडे पाठ फिरवली आहे. (Nafed Harbhara Kharedi)

१७ एप्रिलपर्यंत धाराशिव हमीभाव केंद्रावर एकाही शेतकऱ्याने हरभरा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली नाही. जिल्ह्यातील हमीभाव केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी १ एप्रिलपासून नोंदणी सुरू झाली आहे.  (Nafed Harbhara Kharedi)

मात्र, नाफेडकडून उशिराने होणारी नोंदणी व माप झाल्यानंतर जवळपास एक महिन्याने मिळणाऱ्या चुकाऱ्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीकडे पाठ फिरवली १७ एप्रिलपर्यंत एकाही शेतकऱ्याने घातला केंद्रावर नाही हरभरा आहे. नोंदणी सुरू होऊन तीन आठवडे उलटत आले आहेत. (Nafed Harbhara Kharedi)

धाराशिव हमीभाव केंद्रावर एकाही शेतकऱ्याने हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली नाही. अडत बाजारापेक्षा अधिक भाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना नाफेडच्या विविध अटींसह चाळणी, गाळणीत शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

अडत बाजारात थेट माल विक्री होत असून, चाळणी व गाळणी केली जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा अडत बाजारावर हरभरा विक्री करणे सोयीस्कर पडत आहे. यामुळे नाफेडकडे हरभरा विक्री करण्यासाठी शेतकरी नोंदणी करताना दिसत नाहीत.

खरीप हंगामातील सोयाबीनची नोंदणी करूनही नाफेडने अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले नाही. सोयाबीन प्रमाणेच हरभरा घालतानाही गैरसोयची भीती शेतकऱ्यांना आहे. यामुळे नोंदणी सुरू होऊनही शेतकरी हमी भाव खरेदी केंद्राकडे फिरकताना दिसत नाहीत. ५५०० ते ५६०० रूपये दराने ते अडत बाजारात हरभरा विक्री करताहेत.

हरभरा खरेदीसाठी वरिष्ठ कार्यालयातून नोंदणीसाठी सूचना मिळाली असून, १ एप्रिलपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसून अद्याप हरभरा विक्रीसाठी नोंदणी झाली नाही. ज्या शेतकऱ्यांना हमीभाव केंद्राकडे हरभरा विक्री करावयाची आहे, त्यांनी नोंद करावी. - दीपक शेलार,  खरेदी-विक्री संघ अधिकारी.

कमी दराने होतेय खरेदी...

रब्बी हंगामातील बहुतांश हरभरा पिकाची काढणी झाली असून, निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विक्री केला आहे. नाफेडने १ एप्रिलला नोंदणी सुरू केली आहे. व्याज वाढण्याऐवजी नडलेल्या शेतकऱ्यांनी काढणीनंतर अडत बाजारात हरभरा विक्री केला आहे. - बाबासाहेब कोळगे, शेतकरी, रूईभर.

हे ही वाचा सविस्तर : Summer Jowar Crops: शिवारात उन्हाळी ज्वारी बहरली; पोषक हवामानामुळे उत्पादन वाढणार

टॅग्स :शेती क्षेत्रहरभरामूगशेतकरीबाजारमार्केट यार्ड