Join us

Mosimbi BajarBhav Update : घाम गाळला, नशीब फळफळलं; मोसंबीच्या दरात झपाट्याने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:27 IST

Mosimbi BajarBhav Update : चांगल्या दरवाढीच्या अपेक्षेने वर्षभर काबाड कष्ट करून लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या मृग बहार मोसंबीला गेल्या २ महिन्यांच्या तुलनेत गुरुवारी पाचोडच्या बाजारात प्रति टन उच्च दर (Mosimbi prices increase) मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अनिलकुमार मेहेत्रे

चांगल्या दरवाढीच्या अपेक्षेने वर्षभर काबाड कष्ट करून लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या मृग बहार मोसंबीला गेल्या २ महिन्यांच्या तुलनेत गुरुवारी पाचोडच्या बाजारात प्रति टन २३ हजार रुपयांपर्यंतचा दर(Mosimbi prices increase) मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे चेहरे खुलले आहेत.

पैठण तालुक्यातील पाचोड परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड करतात. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजारपेठेत दररोज मोसंबीचा लिलाव होतो.(Mosimbi Bajar)

परिसरातील शेतकरी येथे दरवर्षी आंबा बहार व मृग बहार मोसंबी विक्रीसाठी आणतात. त्यामुळे येथील मोसंबीची खरेदी करण्यासाठी दिल्ली, कलकात्यासह राज्यातील विविध भागांतील व्यापारी येतात.(Mosimbi Bajar)

सध्या उन्हाचा कडका वाढला असताना बाजारात शेतकरी मृग बहार मोसंबी विक्रीसाठी आणत आहेत. ही मोसंबी जानेवारी महिन्यापासून पाचोडच्या बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.(Mosimbi Bajar)

जानेवारीत या मोसंबीला प्रति टन १३ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळाला होता. फेब्रुवारी महिन्यात यात वाढ होऊन १८ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात शेतकऱ्यांना अधिक दर मिळू लागला आहे.(Mosimbi Bajar)

१९ मार्च रोजी या मोसंबीला २० हजार रुपयांपर्यंतचा प्रति टन दर मिळाला. या दिवशी येथे जवळपास १५० टन मोसंबीची आवक झाली. २० मार्च रोजी या दरात ३ हजार रुपयांनी वाढ होऊन २३ हजार रुपयांपर्यंत प्रति क्विंटलचा मिळाला, तर २०० टन मोसंबीची बाजारात आवक झाली.

विशेष म्हणजे मागील वर्षी या दिवशी २५ हजार रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळाला होता. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मागील वर्षीच्या दराचा टप्पा पार होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मंगू मोसंबीला ८ ते १० हजारांचा भाव

दिवाळीच्या दरम्यान सर्वत्र धुके पडल्याचा परिणाम मोसंबी पिकावर झाला. यामुळे मोसंबीच्या फळाला काळे डाग पडल्यामुळे या मंगू मोसंबीला व्यापाऱ्याकडून ८ ते १० हजार रुपये प्रति टन भाव मिळत आहे.

२० हजार रुपयांचा भाव

गतवर्षी या दिवशी २५ हजार रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळाला होता. त्यामुळे येत्या दोन दिवसांत गतवर्षीच्या दराचा टप्पा पार होण्याची शक्यता आहे.

मंगू रोगाच्या उपाययोजनांसाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. - कैलास भांड, वडजी, शेतकरी

आता उन्हाचे चटके बसू लागले आहेत. त्यामुळे मोसंबीची मागणी वाढल्याने दरातही वाढ होताना दिसून येत आहे. परिणामी, पाचोड परिसरातील शेतकरी मृग बहार मोसंबी विक्रीसाठी मार्केटमध्ये आणत आहेत. आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे. - शिवाजी भालसिंगे, व्यापारी

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : राज्यात पावसाबरोबरच गारपिटीचा इशारा; काय आहे IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रफळेबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड