हिंगोली : मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल होत असताना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहर परिसरत वादळी वारा आणि पावसानेही (rain) तुरळक हजेरी लावली. यामुळे येथील मार्केट यार्डात हळद विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. (market yard)
हळदीला पावसाचे पाणी लागू नये म्हणून शेतकऱ्यांनी वाहनांवर ताडपत्री, मेनकापड झाकले. सध्या हळदीचा हंगाम सुरू असल्याने बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. (market yard)
शनिवार, रविवार या दोन दिवसांच्या बंदमुळे सोमवारी हळदीची आवक (Halad awak) वाढली होती. सकाळी १० वाजेच्या सुमारास मार्केट यार्डासह बाहेरील रस्त्यावरही हळद घेऊन आलेल्या वाहनांची रांग लागली होती. (market yard)
तर दुपारी २ वाजता सर्व वाहने मार्केट यार्ड (market yard) आवारात उभी करण्यात आली होती. लिलाव आणि वजन काटा सुरू असताना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला आणि वादळी वारा सुटला.
तुरळक स्वरूपात पावसाच्या (rain) सरीही कोसळल्याने हळद उत्पादकांची तारांबळ उडाली होती. वातावरणाचा अंदाज घेत बहुतांश शेतकऱ्यांनी वाहनांवर आधीच मेनकापड, ताडपत्री झाकली होती.
यार्डात २०० वाहने उभी
* सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मार्केट यार्डात हळद विक्रीसाठी घेऊन आलेली जवळपास २०० वाहने रांगेत उभी होती. या वाहनांत सुमारे ६ ते ७ हजार क्विंटल हळद असावी, असा अंदाज बाजार समितीने वर्तविला.
* एवढ्या हळदीचा लिलाव आणि वजनकाटा करण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मार्केट यार्डात मुक्कामी राहण्याची वेळ येणार आहे.
अवकाळीचा फटका
अचानक आलेल्या पावसामुळे वाळायला ठेवलेल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. गेल्या आठ दिवसांपासून दुपारी एक वाजेपर्यंत ऊन पडत असून दुपारी साडेतीन वाजेदरम्यान अभाळ दाटून येत आहे.
काल (५ मे) रोजी दुपारी बारा वाजेपासूनच काहीवेळ उन व काहीवेळ दमट वातावरण राहिले होते. सायंकाळी पाच वाजेदरम्यान औंढा नागनाथ, कळमनुरी, कडोळी, डिग्रस कन्हाळे, वसमत, शिरडशहापूर, जवळाबाजार, पुसेगाव, जवळा पांचाळ, हट्टा, दांडेगाव, वरुड चक्रपान, सेनगाव, पानकनेरगाव आदी गावांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, काही ठिकाणी विजांचा कडकडाट सुरु होता.