Join us

Market Update : नवीन वर्षात रासायनिक खतांच्या किमती महागणार; बाजारात साखर, सोयाबीन, खाद्यतेल तेजीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:25 IST

Agriculture Market Update : नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा आर्थिक फटका बसणार आहे. यासोबत साखरेसह खाद्यतेल, सोयाबीन, तूर तेजीत असून सोने आणि चांदीचे दर स्थिर आहेत.

संजय लव्हाडे

जालना : नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा आर्थिक फटका बसणार आहे. यासोबत साखरेसह खाद्यतेल, सोयाबीन, तूर तेजीत असून सोने आणि चांदीचे दर स्थिर आहेत.

नव्या वर्षांत रासायनिक खतांच्या किमतीमध्ये तब्बल २०० ते ३०० रुपयांनी वाढ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही वाढलेली दरवाढ १ जानेवारी २०२५ पासून लागू करण्यात येणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ होणार आहे. खताची किंमतीतही १ हजार ५९० रुपये झाली आहे.

बाजारभाव

गहू - २७०० ते ४०००ज्वारी - २००० ते ३२००बाजरी - २६०० ते ३०००मका - १९०० ते २२५०हरभरा - ४००० ते ५८००मूग - ५५०० ते ७२००गूळ - ३००० ते ३७००

हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी

सरकारने यंदा सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला; पण सध्या खुल्या बाजारात सोयाबीनला सरासरी ४ हजारांचाच भाव मिळत आहे. नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी ११८७ शेतकऱ्यांकडून १८१५० क्विंटल इतकी झाली आहे. जालना बाजारपेठेत सोयाबीनच्या दरात किंचित तेजी आली असून दररोजची आवक ५००० पोते आणि भाव ३५०० ते ४६५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

तुरीचे दर गडगडले

• सीसीआय मार्फत १२७७ शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ४०७०५ क्विंटल इतकी कापसाची खरेदी झाली असून कापसाचे भाव ७१२४ ते ७४२१ रुपये प्रति क्चिटल असे आहेत. सध्या शेतकऱ्यांनी शेतातील तूर काढायला सुरुवात केली आहे. सहा दिवसांपूर्वी तुरीला ९८०० रुपये भाव मिळत होता. आता हे दर ६६०० ते ८४५० रुपये क्विंटलपर्यंत खाली आले आहेत.

• जालना बाजारपेठेत तुरीची आवक दररोज ३५०० पोते इतकी आहे. मागणी वाढल्याने सोयाबीनसह मोहरी आणि सूर्यफूल तेलही कडाडले आहे. बाजारपेठेत पामतेल १४५००, सूर्यफूल १३७००, सरकी तेल १३३००, सोयाबीन १३४०० आणि करडी तेलाचे दर २१००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

साखरेचा कोटा कमी

सरकारने जानेवारी महिन्याचा साखरेचा कोटा २२ लाख ५० हजार टन जाहीर केला. हा कोटा अपेक्षेपेक्षा कमी असल्याने साखरेच्या दरात क्विंटलमागे ३० ते ४० रुपयांची तेजी आली. सध्या साखरेचे भाव ३७०० ते ३९०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. लग्नसराई सुरू असताना देखील सोने चांदीच्या दरात मोठे चढ-उतार नाहीत. सोन्याचे दर ७६००० रुपये प्रति तोळा आणि चांदीचे दर ८९००० रुपये प्रति किलो असे आहेत.

हेही वाचा : का उतरतात बाजारभाव? कांदा का रडवतो; उत्पादनापासून ते निर्यात पर्यंत वाचा कांदा बाजाराची सखोल माहिती

टॅग्स :बाजारमार्केट यार्डशेती क्षेत्रजालनाशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्ड