Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेवग्याच्या बाजार दरात शेअर बाजारासारखीच मंदी; शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 09:04 IST

Shevga Bajar Bhav : मागील दोन ते तीन महिने शेवग्याचा भाव गगनाला भिडला होता. २५० ते २०० रुपये किलो भावाने शेवग्याची विक्री सुरू होती. मात्र, बाजारभावच कोसळल्यामुळे शेवगा चक्क ६० ते ८० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे.

मागील दोन ते तीन महिने शेवग्याचा भाव गगनाला भिडला होता. २५० ते २०० रुपये किलो भावाने शेवग्याची विक्री सुरू होती. मात्र, बाजारभावच कोसळल्यामुळे शेवगा चक्क ६० ते ८० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. हवामानातील बदलाचा परिणाम शेवगा पिकावर झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. शिवाय बाजारभाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

शेवगा पीक हवामानावर अवलंबून असून, या पिकावर पाऊस, ढगाळ हवामान, धुके याचा थेट परिणाम होतो. फुलांची गळ झाल्यामुळे शेवगा पिकात घट झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यात मागणी जास्त असते; परंतु उत्पादन कमी असल्याने २५० ते ३०० रुपये किलो दराने विक्री सुरू होती.

यावर्षी हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम शेवगा पिकावर झाला असून, उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे वाढलेल्या दरात घसरण झाली आहे. सध्या ६० ते ८० रुपये किलो दराने शेवग्याची विक्री सुरू आहे. दर घसरल्यामुळे शेवग्यासाठी ग्राहकांकडून वाढती मागणी आहे.

शेवग्याच्या भावात घसरण झाल्यामुळे ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. किरकोळ २० रुपयांना पाच शेंगांची विक्री केली जात आहे. लग्नसराई, उत्सव सुरू असल्यामुळे अन्य भाज्यांप्रमाणे शेवग्यासाठी वाढती मागणी आहे. उत्पादनात घट झाली असली तरी यावर्षीच्या हंगामातील शेवग्याची आवक वाढली आहे.

हिवाळ्यात ३०० रुपये किलोने झाली विक्री

ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत हिवाळ्यामध्ये ३०० रुपये किलो दराने शेवग्याची विक्री झाल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला होता. यंदाच्या हंगामातील शेवग्याचे उत्पादन सुरू झाले आहे. त्यामुळे बाजारात सध्या तरी शेवग्याची आवक वाढल्याचे निदर्शनास येत आहे.

ऐन फुलोऱ्यात ढगाळ वातावरणाचा फटका

• शेवगा हे हवामानावर अवलंबून असलेले पीक असून, फुलोऱ्याच्च्या अवस्थेत ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. उन्हाळ्यात शेवगा खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. शरीरातील उष्णता कमी करून 'नैसर्गिक कुलर' म्हणून काम करतो.

• यात भरपूर लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी व अँटीऑक्सिडंट असतात. जे उन्हाळ्यातील थकवा, डिहायड्रेशन, पचन समस्या दूर करतात. शेवगा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रक्तातील साखर नियंत्रणात राहते, तसेच हाडे मजबूत होतात. त्यामुळे वर्षभर याची मागणी असते.

हेही वाचा : पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड; विक्रमी उत्पादन घेत फायद्याची शेती करणारे सुधारकराव

English
हिंदी सारांश
Web Title : Drumstick Prices Plummet, Farmers Face Losses Like Stock Market Crash

Web Summary : Drumstick prices have crashed from ₹250/kg to ₹60-80/kg due to weather changes affecting production. Farmers face losses despite high demand for drumsticks in weddings and festivals. While winter saw ₹300/kg prices, current increased supply with flowering stage cloudy weather impacted yields.
टॅग्स :भाज्याबाजारशेतकरीशेतीशेती क्षेत्र