शरद मनसुखसावरगाव : मार्च-एप्रिल हा लग्नसराई, यात्रा व सण-उत्सवांचा हंगाम असल्याने फुलांना चांगली मागणी आणि बाजारभाव मिळण्याची अपेक्षा असते.
मात्र, यंदा मुंबईच्या दादर फूलबाजारात भात कोसळल्याने जुन्नर तालुक्यातील मौना खोऱ्यातील फूलशेती करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
कमी दरामुळे अनेकांनी फुलांची तोडणीच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सावरगाव, खिलारवाडी, निमदरी, निमगाव, वडज, पारुंडे, वैष्णवधाम व कुसूर या भागात मोठ्या प्रमाणावर फूलशेती केली जाते.
सध्या झेंडूला प्रतिकिलो केवळ १० ते २० रुपये भाव मिळत असून, परपल व मेघना जातींना सुमारे ३० रुपये, तर शेवंतीला ३० ते ४० रुपये दर मिळत आहे.
या दरात उत्पादन खर्च तर दूरच, मजुरीही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
अवकाळी पावसाचा फटका◼️ एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झेंडू पिकावर रोगराई वाढली.◼️ त्यामुळे औषध फवारणीचा खर्च वाढला असून, उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.◼️ मात्र, त्याच्या तुलनेत बाजारभाव अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे.
तोडणी थांबवण्याची वेळ◼️ जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात झेंडूला ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दर मिळत होता.◼️ परंतु, एप्रिलमध्ये हा दर घसरून १० ते २० रुपयांवर आला आहे.◼️ वाहतूक, हमाली व दलालीचा खर्च वजा केल्यानंतर हातात काहीच राहत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी फुले तोडणेच बंद केले आहे.◼️ सध्या शेतकरी बाजारभाव वाढण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
मागील तीन वर्षांचा झेंडू दर (प्रतिकिलो)◼️ २०२३ : ५० ते ६० रुपये.◼️ २०२४ : ४० ते ५० रुपये.◼️ २०२५ : ४० ते ५० रुपये.◼️ २०२६ : १० ते २० रुपये.
दीड-दोन महिने कष्ट करून फूलशेती केली, पण बाजारभाव नसल्याने भांडवलही वसूल होत नाही. - शेखर पाथळे, शेतकरी, सायगा
मार्चमध्ये काहीसा चांगला दर मिळाला; मात्र एप्रिलमध्ये भाव घसरले. पुढील काही दिवसांत दर वाढण्याची शक्यता आहे. - सुभाष मनसुख, फूलविक्रेते दादर फूलमार्केट मुंबई
अधिक वाचा: रेशनकार्डवरील रॉकेल वाटपाचा दर ठरला; प्रतिलिटर किती रुपयाने मिळणार रॉकेल?
Web Summary : Marigold farmers in Junnar face losses as prices crash in Mumbai's flower market during peak wedding and festival season. Prices fell to ₹10-20/kg due to unseasonal rains and disease, making production unsustainable. Many farmers halt harvesting, awaiting price rise.
Web Summary : मुंबई के फूल बाजार में दाम गिरने से जुन्नर के गेंदा किसानों को नुकसान हो रहा है। शादी और त्योहारों के मौसम में कीमतें ₹10-20/kg तक गिर गईं, क्योंकि बेमौसम बारिश और बीमारी से उत्पादन अस्थिर हो गया। कई किसान फसल काटना बंद कर रहे हैं, कीमतों में वृद्धि का इंतजार कर रहे हैं।