Join us

Maize Market: नवीन मक्याची आवक बाजारपेठेत; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:52 IST

Maize Market : बाजार समितीत उन्हाळी मक्याची आवक (maize arrival) सुरू झाली आहे. या नवीन मक्याला प्रतिक्विंटल काय दर मिळाला ते वाचा सविस्तर

Maize Market :  खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी मक्याची आवक (maize arrival) सुरू झाली आहे. या नवीन मका पिकाला प्रतिक्विंटल १,५०० ते २ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

अवकाळीचा फटका बसल्याने काही शेतमालात आर्द्रतेचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. त्यामुळे दर्जा बघून दर मिळत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. (maize arrival)

चांगले पर्जन्यमान आणि सिंचनाच्या प्रभावी व्यवस्थेमुळे पिकांच्या पेरणी क्षेत्रावर दिसून आला आहे. यंदा मका पिकाचीही लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. २०२४-२५ मध्ये ८ हजार २८९ हेक्टर क्षेत्रावर मका पेरणी झाली. (maize arrival)

चार दिवसांत मक्याची आवक व दर

दिनांकआवकदर
३ एप्रिल४५१९२५
४ एप्रिल२५  २०८०
५ एप्रिल९५   १९७५
७ एप्रिल  १५४  १८३७

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* वेळेवर कापणी आणि योग्य साठवणूक करून मक्याचा दर्जा राखा.

*हवामानाच्या बदलांवर लक्ष ठेवा, जेणेकरून नुकसान होणार नाही.

*बाजारात विक्रीपूर्वी उत्पादनाचे योग्य परीक्षण करून दर ठरवा. येत्या काही दिवसात बाजार समितीत आवक वाढणार असल्याने दरही घसरण्याची शक्यता आहे.

हवामानामुळे मक्याचा दर्जा बदलतो. चांगल्या दर्जाच्या मक्याला अधिक दर मिळतो, तर आर्द्रतेचे प्रमाण जास्त असलेल्या मालाला कमी दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर कापणी करावी. - श्याम जाधव, शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; काय सांगतोय IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमकाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड