Join us

आज कापसाला किती मिळाला दर? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 19:54 IST

शिवजयंतीमुळे आज अनेक ठिकाणच्या बाजार समित्या बंद होत्या.

आज कापसाचे दरही हमीभावापेक्षा कमीच होते.  राज्यभरातील केवळ एका बाजार समितीमध्ये  बाजारदरापेक्षा जास्त दर मिळाला आहे.  तर अनेक शेतकऱ्यांनी दोन वर्षांपासून साठवून ठेवलेला कापूस मातीमोल दराने विक्री करावा लागत आहे. आज शिवजयंतीमुळे अनेक बाजार समित्यांना सुट्टी होती. पणन मंडळाच्या  अधिकृत माहितीनुसार आज ६ बाजार समित्यांमध्ये कापसाचे लिलाव पार पडले. 

दरम्यान, आज  लोकल आणि मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. सावनेर, समुद्रपूर, मौदा, वरोरा-खांबाडा, पुलगाव, सिंदी - सेलू बाजार समितीमध्ये कापसाचे लिलाव पार पडले.  तर मौदा बाजार समिती वगळता सर्वच बाजार समितीमध्ये १ हजार क्विंटलपेक्षा जास्त कापसाची आवक झाली  होती. तर मौदा बाजार समितीमध्ये केवळ १७० क्विंटल कापसाची आवक झाली होती. आजचा उच्चांकी सरासरी दर हा सिंदी-सेलू बाजार समितीमध्ये ७ हजार १५० रूपये  प्रतक्विंटल एवढा मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये १ हजार ६०० क्विंटल कापसाची आवक झाली होती.

आज वरोरा-खांबाडा आणि समुद्रपूर या बाजार समितीमध्ये निच्चांकी सरासरी दर मिळाला असून येथे ६ हजार ७००  रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर होता. येथे अनुक्रमे १ हजार २०० आणि १ हजार ४७१ क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर आजच्या दिवसात ७ हजार ३७०  रूपये प्रतिक्विंटल हा कमाल दर होता. आज ६ हजार ७०० ते ७ हजार १०० रूपये  प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळाला आहे.

आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/02/2024
सावनेर---क्विंटल3500677568256800
समुद्रपूर---क्विंटल1471620072006700
मौदा---क्विंटल170663068306715
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1200600071706700
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल1400620072006750
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल1600640073707150
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड