Join us

शिवजयंती दिवशी सोयाबीनला किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 18:51 IST

शिवजयंतीच्या दिवशी सोयाबीनला किती मिळतोय दर?

आज शिवजयंतीमुळे अनेक बाजार समित्यांना सुट्ट्या होत्या. तर पणन मंडळाच्या अधिकृत  माहितीनुसार आज केवळ ३ बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे लिलाव पार पडले.  त्यामध्ये एकाही बाजार समितीमध्ये हमीभावाएवढा दर मिळाला नसून शेतकऱ्यांना ३०० ते ५०० रूपयांपर्यंतचा फटका बसला आहे. 

दरम्यान, आज मोर्शी, राहता, वरोरा-शेगाव या तीन बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक झाली होती. मोर्शी बाजार समितीमध्ये १९९, राहता बाजार समितीमध्ये ५ तर वरोरा-शेगाव बाजार समितीमध्ये १५ क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. तर या तीनही बाजार समितीमध्ये अनुक्रमे ४ हजार २१५, ४ हजार ३१५ आणि ४ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.

तर आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर हा मोर्शी बाजार समितीमध्ये ४ हजार २१५ रूपये एवढा मिळाला आहे. आजच्या दिवसातील सर्वांत जास्त दर हा राहता बाजार समितीमध्ये ४ हजार ३१५ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.

 

आज सोयाबीनला किती मिळाला दर?

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/02/2024
मोर्शी---क्विंटल199410043304215
राहता---क्विंटल5430043354315
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल15430043004300
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसोयाबीनबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती