Join us

लिंबाचे दर आकारानुसार, मिळतोय चांगला बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 4:43 PM

लहान आकाराची लिंब शेकडा ५०० तर मोठ्या आकाराची लिंब शेकडा एक हजार रुपये अशा दराने विकली जात आहेत.

एकीकडे उन्हाचा पारा ३५ अंशापर्यंत पर्यंत पोहचल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. तर दुसरीकडे लिंबू सरबत पिऊन जीव थंड करणेही अवघड बनले आहे. कारण दोन रुपयांना मिळणारे लिंबू बाजारात आता पाच ते दहा रुपयांना विकले जात आहे.

बाजारपेठेत लिंबाचे दर वाढले आहेत. लहान आकाराची लिंब शेकडा ५०० तर मोठ्या आकाराची लिंब शेकडा एक हजार रुपये अशा दराने विकली जात आहेत. राज्यात विदर्भ, मराठवाडा, पंढरपूर, आंध्र प्रदेश येथून लिंबाची आवक होत असते. मात्र येथून आवक कमी होत असल्याने दर वाढले आहेत.

आवक रोडावलीउन्हाळ्यात लिंबांना मोठी मागणी असते. गारपीट व अवकाळी पावसामुळे लिंबाच्या बागांना मोठा फटका बसला असून, आवक कमी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तीच चार महिन्यांपूर्वी बाजारात लहान आकाराची पाच रुपयांना पाच लिंबू मिळत होते. मात्र आता पाच रुपयांत एकच लिंबू मिळत आहे.

लिंबाचे दर आकारानुसारबाजारपेठेमध्ये सर्वात लहान आकाराची लिंब ५०० रुपये शेकडो, मध्यम आकाराची ६५०, ८००, ९०० तर सर्वात मोठ्या आकाराच्या लिंबाचा शेकडा दर एक हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

शेतकरी बंधूनी लिंबू काढणी करताना अपरिपक्व लिंबाची काढणी करू नये, बऱ्याचदा बाजारभाव चांगले मिळतात त्यामुळे लिंबू लवकर काढले जाते. लिंबाचे दर आकारानुसार ठरले जातात. त्यामुळे योग्यवेळी काढणी करणे जरूरीचे आहे.

टॅग्स :बाजारमार्केट यार्डशेतकरीपाऊसगारपीट