यवतमाळ : मार्च एंडिंग, सण-उत्सव आणि शासकीय सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या सलग सहा दिवस बंद राहणार आहेत.(Yavatmal APMC Market)
त्यामुळे शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प होणार असून, शेतकऱ्यांना एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.(Yavatmal APMC Market)
मार्च अखेरीस बँकांचे आर्थिक वर्ष संपत असल्याने बहुतांश व्यवहार थांबविले जातात. बँकिंग ट्रान्झॅक्शनवर परिणाम होत असल्याने बाजार समित्यांतील खरेदी-विक्री प्रक्रियाही थांबवावी लागते.(Yavatmal APMC Market)
यासोबतच एप्रिलच्या सुरुवातीलाच सलग सण-उत्सव आणि सुट्ट्या आल्याने बाजार पूर्णपणे बंद राहणार आहे.(Yavatmal APMC Market)
३१ मार्च रोजी महावीर जयंती, १ एप्रिलला आर्थिक वर्षअखेरची हिशेब प्रक्रिया, २ एप्रिलला हनुमान जयंती आणि ३ एप्रिलला गुड फ्रायडे अशी सुट्ट्यांची मालिका आहे. त्यानंतर ४ एप्रिलला शनिवार आणि ५ एप्रिलला रविवार आल्याने सलग सहा दिवस बाजार समित्यांचे कामकाज ठप्प राहणार आहे.(Yavatmal APMC Market)
हिशेब प्रक्रिया आणि सुट्ट्यांचा ताण
१ एप्रिल रोजी बाजार समित्यांकडून वार्षिक हिशेब, खर्च व इतर अंतर्गत प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. मोठ्या बाजार समित्यांना यासाठी अधिक वेळ लागत असल्याने व्यवहार सुरू होण्यास विलंब होतो. त्यातच सलग सुट्ट्यांमुळे कामकाज पूर्णपणे थांबले आहे.
शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी करू नये
मार्च एंडिंगपूर्वी आणि नंतर सलग सुट्ट्या असल्याने ३० मार्च रोजी बाजारात मोठी गर्दी होईल आणि दर घसरण्याची शक्यता निर्माण होईल, या भीतीने अनेक शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणलाच नाही. त्यामुळे सोमवारी बाजारात अपेक्षित चहलपहल दिसून आली नाही.
सोयाबीन-हरभरा दरात घसरण
सोमवारी सोयाबीनला ५,२०० ते ५,३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. मात्र गेल्या पंधरा दिवसांत या दरात ३०० ते ४०० रुपयांची घसरण झाली आहे.
हरभऱ्याच्या दरातही अशीच घसरण झाली असून, सध्या दर सुमारे ५,१०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत.
बाजार समित्या बंद राहिल्याने शेतमालाची आवक ठप्प झाली असून, दरातील चढ-उतारावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे पुढील बाजारस्थिती काय राहील, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Hingoli Halad Market Yard : हळद मार्केट यार्ड बंद; आता काय करणार शेतकरी?
अधिक वाचा : Beed APMC Market : गुढीपाडव्यानंतर 'या' मोंढ्यात उसळी; गहू-ज्वारीची विक्रमी आवक
Web Summary : Yavatmal APMC market will be closed for six consecutive days due to holidays and financial year-end. This halt in trading is expected to affect the prices of soybean and chickpea, causing concern among farmers awaiting market reopening.
Web Summary : यवतमाल APMC बाजार छुट्टियों और वित्तीय वर्ष के अंत के कारण लगातार छह दिनों तक बंद रहेगा। व्यापार में इस रुकावट से सोयाबीन और चने की कीमतों पर असर पड़ने की उम्मीद है, जिससे बाजार खुलने का इंतजार कर रहे किसानों में चिंता है।