वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने दरात घसरण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे गहू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून, मागील आठ ते दहा दिवसांत गव्हाच्या दरात प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपयांची घसरण झाली आहे.
मागील काही दिवसांपासून परिसरात गव्हाच्या काढणीला सुरुवात झाली आहे. काढणी झालेला गहू विक्रीसाठी शेतकरी मार्केटमध्ये आणत आहेत. गव्हाची आवक वाढल्याने सध्या बाजार समितीत दररोज ७०० ते ८०० क्विंटल गव्हाची आवक होत आहे. सुरुवातीला गव्हाची पत पाहून २२०० ते २७०० रुपये प्रति क्विंटल या दराने विकला जात होता; मात्र, मागील काही दिवसांत दरात घसरण होऊन सध्या गहू २१०० ते २४०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे.
दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यताबाजारात गव्हाची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. उत्पादन खर्च वाढलेला असताना गव्हाला अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र आहे. दरात झालेली ही घसरण कायम राहिल्यास गहू उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे. तर गव्हाच्या दरातील घसरणीमुळे किमान आधार भावाच्या (एमएसपी) अंमलबजावणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
सध्याचे दर पाहुयात...
शरबती गव्हाला सोलापूर मार्केटमध्ये ३३०५ रुपये, पुणे मार्केटमध्ये ४ हजार ३०० रुपये, तर नागपूर मार्केटमध्ये ती जागा ३ हजार २५० रुपये दर मिळाला.
लोकल गव्हाला अकलूज मार्केटमध्ये २७०० रुपये, नागपूर मार्केटमध्ये २२१२ रुपये, देऊळगाव राजा मार्केटमध्ये २१०० रुपये, उल्हासनगर मार्केटमध्ये ३२०० रुपये तर काटोल मार्केटमध्ये २२५० रुपये दर मिळाला.
तसेच मुरूम मार्केटमध्ये बन्सी गव्हाला २३४८ रुपये तर बीड मार्केटमध्ये हायब्रीड गावाला २३४३ रुपये दर मिळाला.
तसेच जळगाव मार्केटमध्ये 147 या गव्हाला २२०० रुपये तर वाशिम मार्केटमध्ये 2189 गव्हाला ०२ हजार रुपये, परतुर मार्केटमध्ये २१०० रुपये, तर औराद शहाजानी मार्केटमध्ये २१५० रुपये दर मिळाला.
शरबती गव्हाला क्विंटलमागे काय दर मिळतोय, वाचा जिल्हानिहाय आजचे गहू बाजारभाव
Web Summary : Wheat prices have fallen by ₹300-400 per quintal in Wardha due to increased supply, impacting farmers. Current rates: Sharabati wheat fetches ₹3305-4300 in Solapur/Pune, local varieties ₹2100-3200 across markets.
Web Summary : वर्धा में आपूर्ति बढ़ने से गेहूं की कीमतों में ₹300-400 प्रति क्विंटल की गिरावट आई है, जिससे किसान प्रभावित हैं। वर्तमान दरें: शरबती गेहूं सोलापुर/पुणे में ₹3305-4300, स्थानीय किस्में बाजारों में ₹2100-3200।