Weekly Kanda Market : कांद्याची लासलगाव बाजारातील (Lasalgaon Kanda Market) मागील सप्ताहातील सरासरी किंमती १२३९ रुपये प्रति क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत १४ टक्के वाढ झाल्याचे बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष यांच्या माहितीनुसार देण्यात आले आहे.
मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या आवकमध्ये (Kanda Aavak) राष्ट्रीय पातळीवर ५.३७ टक्के इतकी घट झाली आहे. राज्य पातळीवर १३.१५ टक्के इतकी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी पिंपळगाव बाजारात कांद्याच्या सरासरी किंमत सर्वाधिक १२५० टक्के क्विंटल होती, तर सोलापूर बाजारात सर्वात कमी किंमत ७६७ रुपये प्रतिक्विंटल होती.
मागील सप्ताहातील कांद्याच्या निवडक बाजारातील सरासरी किमती (Kanda Bajar Bhav) पाहिल्या असता लासलगाव बाजारात १२३९ रुपये, सोलापूर बाजारात ७६७ रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १२५० रुपये, अहिल्या नगर बाजारात ८२५ रुपये, तर पुणे बाजारात १०७० रुपये दर मिळाला.
दरम्यान मागील दोन महिन्यापासून कांदा कवडीमोल भावात विकला जात आहे. परिणामी शेतकऱ्यांना काहीच परवडत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे आवक देखील वाढते आहे, मात्र दुसरीकडे बाजारभावात सुधारणा होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.