Join us

Kanda Bajarbhav : राज्यात कांदा बाजारभावात 7 टक्के, तर आवकेत 28 टक्क्यांची घट, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 17:11 IST

Kanda Bajarbhav : देशपातळीवर व राज्यात कांद्याच्या आवकमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत २८ टक्क्यांनी घट झाली आहे.

Kanda Bajarbhav : कांदा बाजारभावात (Weekly Kanda Market) काहीसा चढ उतार दिसून येत आहे. मागील आठवड्याचा बाजारभाव पाहिला असता सरासरी ४ हजार २४४ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला होता. काही निवडक बाजार समित्या वगळता या आठवड्यात देखील ४ हजार रुपये ते ४ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे चित्र आहे. 

बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाच्या अहवालानुसार कांद्याची बाजारातील लासलगाव (Lasalgaon Kanda Market) मागील सप्ताहातील सरासरी किंमती  ४२४४ प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत ७ टक्क्यांनी घट झाली आहे. देशपातळीवर व राज्यात कांद्याच्या आवकमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत २८ टक्क्यांनी घट झाली आहे.

मागील आठवड्यात पिंपळगाव बाजारात (Pimplagaon Kanda Market) कांद्याच्या किंमती ४३६० रुपये प्रति क्विंटल इतक्या सर्वाधिक होत्या. तर सोलापूर बाजारात कांद्याच्या किंमती २८८३ रुपये प्रति क्विंटल इतक्या होत्या. तर सोलापूर बाजारात प्रतिक्विंटल २८८३ रुपये, अहमदनगर बाजारात २९७५ रुपये तर पुणे बाजारात ०३ हजार ३०८ रुपये दर मिळाला.

कांदा दरातील घसरण?

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून कांदा बाजार भाव समाधानकारक होते. साधारण २२ सप्टेंबरपर्यंत कांद्याला चांगला भाव मिळत होता. मात्र त्यानंतर हळूहळू दरात घसरण होत गेली. कांद्याचे आवकेबाबतही सप्टेंबर महिन्यापासूनच चढ-उतार सुरू असल्याचं या बाजार अहवालावरून निदर्शनास येत आहे.

हेही वाचा : Soyabean Market : सोयाबीनची आवक 23 टक्क्यांनी वाढली, बाजारभाव कसा? जाणून घ्या सविस्तर 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्ड