पुरुषोत्तम करवा
आखाती देशांमध्ये धुमसणाऱ्या युद्धाचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठेवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. एकीकडे युद्धामुळे आयात-निर्यातीवर परिणाम होऊन खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक साहित्यांचे भाव कडाडले असताना, दुसरीकडे माजलगावच्या बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव कमालीचे कोसळले आहेत. (Vegetable Prices Drop)
उत्पादन दुप्पट आणि ग्राहक कमी, अशा कात्रीत शेतकरी सापडला असून भाजीपाला अक्षरशः 'बेभाव' विकण्याची वेळ आली आहे.(Vegetable Prices Drop)
निसर्गाची कृपा पण शेतकऱ्यांच्या पदरी निराशा
यावर्षी माजलगाव धरण परिसरात आणि संपूर्ण तालुक्यात परतीचा पाऊस समाधानकारक झाला. यामुळे विहिरी, बोअर आणि धरणे ओसंडून वाहत आहेत. मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने भाजीपाल्याची लागवड केली.
लागवडीचे प्रमाण यंदा दुपटीने वाढल्याने उत्पादनही भरघोस झाले. मात्र, बाजारात आवक वाढली असली तरी त्या प्रमाणात उठाव नसल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
थैली भरण्यासाठी आता निम्म्याहून कमी खर्च
माजलगावच्या आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर कोसळल्याने गृहिणींचे बजेट मात्र सुखावले आहे. एरवी ज्या पिशवीभर भाजीपाल्यासाठी १५० ते २०० रुपये मोजावे लागत होते, तोच भाजीपाला आता केवळ ६० ते ७० रुपयांत मिळत आहे.
दुपारी १० रुपये, तर सायंकाळी फेकून देण्याची वेळ
बाजारात दुपारी दोन वाजेपर्यंत भाज्यांचे दर स्थिर असतात, मात्र जसजशी सायंकाळ होते, तसे भाव कोसळतात.
परिस्थिती इतकी बिकट आहे की, अनेक शेतकरी सायंकाळी सहा नंतर उरलेला भाजीपाला बाजारातच सोडून घरी परतत आहेत. यामुळे बाजारस्थळी रात्रीच्या वेळी कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत.
बाजारातील सद्यस्थिती (प्रति किलो दर)
| भाजीपाला | दर (रुपये) |
| टमाटे | १० रुपये |
| वांगे | २० रुपये |
| कांदे | १५ - २० रुपये |
| अद्रक | ३० रुपये |
| गवार | १२० रुपये |
| लसूण | ४० रुपये |
| कोबी / फूलकोबी | २० रुपये |
शेतकऱ्यांची व्यथा: रिक्षाभाडे निघणेही कठीण
गेल्या ३-४ वर्षांपासून मी वांग्याचे उत्पादन घेतोय. गेल्या वर्षीपर्यंत एका कॅरेटला ४०० ते ५०० रुपये भाव मिळत होता. मात्र, आता तोच भाव १०० रुपयांवर आला आहे. या पैशातून बाजारात येण्या-जाण्याचा रिक्षाखर्च निघणेही मुश्कील झाले आहे. - दत्तात्रय शिंदे, भाजीपाला उत्पादक शेतकरी
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेल आणि इतर खाद्यपदार्थांची महागाई वाढत असताना, घाम गाळून पिकवलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
हे ही वाचा सविस्तर : MGNREGA Gotha Yojana : 'मागेल त्याला काम' कुठे गायब? गोठा योजना रखडली
अधिक वाचा : Crop Loan : पीक कर्जात २५ टक्के वाढ; कोणत्या पिकाला किती फायदा? वाचा सविस्तर
Web Summary : Despite war-induced inflation, Majalgaon sees vegetable prices plummeting due to overproduction and low demand. Farmers face losses as abundant harvests lead to distress sales, with some produce left to rot. Consumers benefit from drastically reduced prices.
Web Summary : युद्ध के कारण महंगाई बढ़ने के बावजूद, माजलगाँव में सब्जियों की कीमतें अधिक उत्पादन और कम मांग के कारण गिर रही हैं। किसानों को नुकसान हो रहा है क्योंकि भरपूर फसल से संकटपूर्ण बिक्री हो रही है, कुछ उपज सड़ने के लिए छोड़ दी जाती है। उपभोक्ताओं को कीमतों में भारी कमी से लाभ होता है।