Vegetable Market : लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरानंतर भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने बाजारात दर वाढले आहेत. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मेथी यांना चांगला भाव मिळत असून शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. (Vegetable Market)
अतिवृष्टी आणि पुरामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला असला, तरी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सध्या काहीसा दिलासा मिळाला आहे. (Vegetable Market)
सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी झाली असून दरवाढीचे चित्र दिसून येत आहे.(Vegetable Market)
सध्या लातूर बाजारात टोमॅटो ३० ते ४० रुपये किलो, तर कांदा २५ ते ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. पालेभाज्यांनाही चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (Vegetable Market)
टोमॅटो-कांद्याची तेजी कायम
अतिवृष्टीनंतर ज्या शेतकऱ्यांनी धैर्याने भाजीपाला जोपासला, त्यांना आता चांगला फायदा होत आहे. ठोक बाजारात टोमॅटोचा दर २,००० ते २,५०० रुपये क्विंटल, कांदा १,६०० ते २,००० रुपये क्विंटल, तर बटाटा १,५०० ते २,००० रुपये क्विंटल दरम्यान विक्री होत आहे.गावरान टोमॅटोची आवक कमी असल्यामुळे किरकोळ बाजारात त्याचे भाव ४० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.
मेथी-कोथिंबिरीचे दर आकाशाला टेकले
पावसाने झोडपल्याने मेथी आणि कोथिंबिरीची आवक खूपच कमी झाली आहे.
मेथी जुडी – ३० ते ४० रुपये
कोथिंबीर – १५ ते २० रुपये जुडी असे दर सध्या बाजारात मिळत आहेत.
ग्रामीण भागातील शेतकरी पावसाने प्रभावित मेथी घेऊन बाजारात येत आहेत, तरी मागणीमुळे दर वाढलेले आहेत.
इतर भाज्यांचाही दर वाढीच्या मार्गावर
आवक घटल्याने बहुतांश भाज्यांचे दर वाढले आहेत.
| भाजी | दर (रु./किलो) |
|---|---|
| भेंडी | ४० ते ६० |
| दोडका | ६० ते ८० |
| गवार | ८० ते १२० |
| कोबी | ६० ते ८० |
| शेपू | १५ ते २० जुडीप्रमाणे |
दर वाढल्याने ग्राहकांचे खिशाला झळ पोहोचली असली, तरी शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा, पण उत्पादन खर्च वाढला
पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान केले. सोयाबीन, कोथिंबीर आणि पालेभाज्या शेतातच मातीमोल झाल्या. तरीही काही शेतकऱ्यांनी भाजीपाला जोपासून संकटातही उत्पादन काढले आणि आता त्यांना बाजारात चांगले दर मिळत आहेत.
Web Summary : Heavy rains in Latur district reduced vegetable production, increasing market prices. Farmers are relieved by good prices for tomatoes, onions, coriander, and fenugreek, offsetting some losses. But Consumers face higher costs.
Web Summary : लातूर जिले में भारी बारिश से सब्जी उत्पादन में कमी आई, जिससे बाजार में कीमतें बढ़ गईं। टमाटर, प्याज, धनिया और मेथी के अच्छे दाम मिलने से किसानों को कुछ राहत मिली है। लेकिन उपभोक्ताओं को अधिक लागत का सामना करना पड़ता है।