Join us

Turmeric Market: नवी हळद 'या' बाजारात दाखल; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 16:12 IST

Turmeric Market : नव्या हळदीची आवक आता बाजारात सुरू होत आहे. त्यामुळे आता नव्या हळदीला काय भाव मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी राज्यातील कोणत्या बाजारात नव्या हळदीच्या हंगामास सुरूवात झाली. मुहूर्ताच्या वेळी काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर.

वाशिम : नव्या हळदीची (Turmeric) आवक आता बाजारात (Market) सुरू होत आहे. त्यामुळे आता नव्या हळदीला काय भाव मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी राज्यातील वाशिम बाजारात नव्या हळदीच्या हंगामास (Season) सुरूवात झाली. मुहूर्ताच्या वेळी काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) रोजी नवीन हळदीची खरेदी सुरू करण्यात आली. या शेतमालास मुहूर्ताच्या खरेदीवर प्रतिक्विंटल १३ हजार १०१ रुपयांचा भाव मिळाला.

बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामात उत्पादित हळद ही विक्रीसाठी दाखल झाली आहे. यावेळी नवीन शेतमालाचा मुहूर्त करून बाजार समितीच्या वतीने शेतकरी किसन विठोबा बर्वे रा. कान्हरखेड तसेच अडते, व्यापारी यांचा सत्कार करण्यात आला.

मुहूर्ताच्या खरेदीत हळदीला प्रतिक्विंटल १३ हजार १०१ रुपयांचा भाव मिळाला. आता बाजारात नवीन हळदीची  आवक सुरू होणार असल्याचे समितीने सांगितले.

यावेळी बाजार समितीचे सचिव वामन आनंदराव सोळंके, संचालक नितीन करवा, हिराभाई जानीवाले, व्यापारी राजू चरखा, राजू मुंदडा, प्रशांत बरडे, ज्ञानेश्वर जाधव, सुधाकर मुसळे, राजेश पुरोहित, कर्मचारी रामहरी वानखेडे, माधवराव गोटे, राहुल चव्हाण, तसेच इतर कर्मचारी व सर्व आडते, मापारी, मदतनीस उपस्थित होते.

हे ही वाचा सविस्तर :  Tur procurement: तूर उत्पादकांना दिलासा; ही आहे नोंदणीची शेवटची तारीख वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड