Join us

Tomato Market : वीस दिवसांत टोमॅटोच्या दरात 47 टक्क्यांची घट, दर अचानक का घसरले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:26 IST

Tomato Market : त्यामुळे सद्यस्थितीत ज्या शेतकऱ्यांचा टोमॅटो मार्केटला येतो आहे, त्यांना आर्थिक फटका बसत आहे. 

Tomato Market : जुलै महिना आणि ऑगस्ट महिन्याचा पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात टोमॅटोला चांगला (Tamate Market) दर मिळाला. मात्र ऑगस्टच्या शेवटी टोमॅटोच्या दरात घसरण व्हायला सुरवात झाली. तर आतापर्यंतच्या २० दिवसांत जवळपास ४७ टक्क्यांनी दर घसरले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत ज्या शेतकऱ्यांचा टोमॅटो मार्केटला येतो आहे, त्यांनी आर्थिक फटका बसत आहे. 

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत ११ ऑगस्टपासून टमाट्यांच्या लिलावास सुरुवात झाली. पहिले काही दिवस चांगला भाव खाल्ला; पण कालांतराने आवक वाढू लागली व इतरही ठिकाणचे टमाटे बाजारपेठेत येऊ लागल्याने देशभरात पुरवठा वाढून टमाट्याचे भाव उतरण्यात सुरुवात झाली. 

११ ऑगस्ट रोजी ६७५ रुपये प्रतिक्रेट विकले गेले. टमाटे ३१ ऑगस्ट रोजी ३६१ रुपये प्रति कॅरेटवर येऊन ४७ टक्क्यांनी उतरला. मनमाड बाजारपेठेत टमाट्याच्या भावात प्रचंड मोठी घसरण झाली. ११ ऑगस्टपासून ३१ ऑगस्टपर्यंत सातत्याने भाव उतरलेले दिसून आले. 

मनमाड बाजारातदेखील टमाट्याचे भाव पन्नास रुपये किलोवरून कमी होऊन २० रुपये किलो इतके उतरले आहेत. बाजारातील विक्रेते भगवान परदेशी यांनी सांगितले. देशभरातील बाजार जवळपास सर्वच समितीत टमाटे विक्रीस आल्यामुळे मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार भाव उतरले आहेत.

पहा दर कसे घसरले? 

११ ऑगस्ट रोजी ६७५ रुपये प्रति कॅरेट, १२ ऑगस्ट रोजी ६६१ रुपये, १३ ऑगस्ट रोजी ६५५ रुपये, १४ ऑगस्ट रोजी ६३९ रुपये, १६ ऑगस्ट रोजी ७४५ रुपये, १८ ऑगस्ट रोजी ८५८ रुपये, १९ ऑगस्ट रोजी ७०० रुपये तर ३१ ऑगस्ट रोजी ३६१ रुपये असा दर मिळाला.

 

Kanda Market : पुणे, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळाला, वाचा सविस्तर 

 

टॅग्स :टोमॅटोमार्केट यार्डकृषी योजनाशेती