Join us

Tomato Market : पिंपळगाव बाजारात टोमॅटोची सव्वा लाख कॅरेटची आवक, काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 18:30 IST

Tomato Market : काल पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटो कॅरेटला 451 रुपयांचा दर मिळाला. 

Tomato Market : काही दिवसांपासून टोमॅटोला समाधानकारक (Tomato Market) दर मिळत होते. मात्र पुन्हा एकदा कॅरेटमागे 50 रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. काल पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कॅरेटला 451 रुपयांचा दर मिळाला. 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 03 हजार 903 क्विंटलची आवक झाली. काल पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Tomato Market) बाजार समितीत टोमॅटोची एक लाख 14 हजार 184 कॅरेटची आवक झाली तर कॅरेट मागे कमीत कमी 50 रुपयांपासून ते सरासरी 451 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर सोलापूर बाजारात वैशाली टोमॅटोला क्विंटल मागे 1600 रुपये, जळगाव बाजारात 02 हजार रुपये, नागपूर बाजारात 04 हजार 250 रुपये असा दर मिळाला. 

तर पनवेल बाजारात नंबर एकच्या टोमॅटोला 04 हजार 500 रुपये, कामठी बाजारात लोकल टोमॅटोला 06 हजार रुपये, नागपूर बाजारात 2750 रुपये, तर सर्वसाधारण टोमॅटोला कोल्हापूर बाजारात 1300 रुपये, श्रीरामपूर बाजारात 3500 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/11/2024
कोल्हापूर---क्विंटल32450020001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल13050025001500
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल755120024001600
संगमनेर---क्विंटल6050025001500
श्रीरामपूर---क्विंटल30200040003500
राहता---क्विंटल26100027001800
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल16253030002850
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल106220026002400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10200030002500
पुणे-मोशीलोकलक्विंटल400200030002500
नागपूरलोकलक्विंटल700200030002750
मंगळवेढालोकलक्विंटल37100023001700
कामठीलोकलक्विंटल30550065006000
पनवेलनं. १क्विंटल485400050004500
सोलापूरवैशालीक्विंटल37130035001600
जळगाववैशालीक्विंटल99100030002000
नागपूरवैशालीक्विंटल300200050004250
भुसावळवैशालीक्विंटल24250030002800
टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक