Join us

Tomato Market : संगमनेर बाजारात टोमॅटोची सर्वाधिक आवक, आज कुठे-काय बाजारभाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 20:21 IST

Tomato Market : आज 27 ऑगस्ट रोजी संगमनेर बाजारात टोमॅटोची सर्वाधिक 5 हजार 100 क्विंटलची आवक झाली.

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Market) 11364 क्विंटलची आवक झाली. यात टोमॅटोला आज सरासरी 01 हजार रुपयांपासून 02 हजार रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळाला. एकूणच मागील काही दिवसात टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण झाल्याचे चित्र आहे. 

आज 27 ऑगस्ट रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार संगमनेर बाजारात टोमॅटोची सर्वाधिक 5 हजार 100 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी सरासरी 1025 रुपये क्विंटलला दर मिळाला. तर हायब्रीड टोमॅटोला पंढरपूर बाजारात 800 रुपये, कळमेश्वर बाजारात 2335 रुपये तर रामटेक बाजारात 1900 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात 1300 रुपये तर नागपूर बाजारात 2025 रुपये दर मिळाला. 

तर नंबर एकच्या टोमॅटोला रत्नागिरी बाजारात 1200 रुपये तर इस्लामपूर बाजारात 1250 रुपये दर मिळाला. आज वैशाली टोमॅटोला 1000 रुपये, नागपूर बाजारात 2350 रुपये, भुसावळ बाजारात 1200 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकसंगमनेर