Join us

Tomato Market : टोमॅटो बाजारात 16 टक्क्यांनी घट, काय दर मिळतोय, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 20:55 IST

Tomato Market : मागील आठवड्याच्या तुलनेत सध्याच्या किंमतीमध्ये १६ टक्क्यांनी घट झाली आहे.

Tomato Market :  टोमॅटोच्या पुणे बाजारातील मागील सप्ताहातील सरासरी किंमती २२०० प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत सध्याच्या किंमतीमध्ये १६ टक्क्यांनी घट झाली आहे.

देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या आवक मध्ये १७.८ टक्केनी घट झाली आहे. प्रमुख APMC बाजारापैकी मुंबई बाजारात सर्वाधिक किंमती ३६४० रुपये क्विंटल होत्या. तर सोलापूर बाजारात सर्वात कमी किंमती १७०० रुपये प्रति क्विंटल होत्या.

आज पिंपळगाव बाजारात प्रति कॅरेट कमीत कमी १२१ रुपये तर सरासरी ८५१ रुपये दर मिळाला. लासलगाव बाजारात कमीत कमी ५० रुपये तर सरासरी ८६१ रुपये दर मिळाला. 

मागील आठवड्यातील टोमॅटोच्या निवडक बाजारातील सरासरी किमती पाहिले असता पुणे बाजारात प्रतिक्विंटल २२०० रुपये, मुंबई बाजारात ३६४० रुपये, नारायणगाव बाजारात ०३ हजार रुपये, संगमनेर बाजारात २२०८ रुपये तर सोलापूर बाजारात १७०० रुपये दर मिळाला.

- मा. बाळासाहेब ठाकरे कृषीव्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) (साप्ताहिक किंमत सनियंत्रण अहवाल)

टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रमार्केट यार्डकृषी योजनाशेती