Join us

नाशिकची द्राक्ष आणि जळगावच्या केळीला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 6:48 PM

आज रविवार असल्याने काही निवडक बाजारसमित्यांमध्ये द्राक्ष आणि केळीची आवक झाली.

आज रविवार असल्याने काही निवडक बाजारसमित्यांमध्ये द्राक्ष आणि केळीची आवक झाली. आजच्या बाजार अहवालानुसार द्राक्षाला प्रति क्विंटलला सरासरी 2800 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तर किलोला सरासरी शंभर रुपयांचा दर मिळाला. तर केळीला प्रति क्विंटलला सरासरी 1000 रुपयापर्यंत दर मिळाला. मात्र इतर काही बाजार समित्यांमध्ये मात्र खूपच कमी दर मिळाल्याचे पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार दिसून आले. 

आज 10 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सहा बाजार समित्यांमध्ये द्राक्षांची आवक झाली. यात जवळपास 411 क्विंटलची आवक झाली. तर सोलापूर बाजार समितीमध्ये 2225 नग प्राप्त झाले होते. तर नगाला शंभर रुपयांचा दर मिळाला. अहमदनगर बाजार समितीमध्ये 253 क्विंटलची आवक झाली. या बाजार समितीत सरासरी  2750 रुपयांचा बाजारभाव मिळाला. नाशिक बाजार समितीमध्ये नाशिक द्राक्षांची 15 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी सरासरी 2800 रुपयाचा बाजारभाव मिळाला. जळगाव बाजार समितीत 3500  रुपयांचा बाजारभाव मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत सरासरी 5000 रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला. धाराशिव बाजार समितीमध्ये सरासरी 2100 रुपयांचा बाजारभाव मिळाला. 

आजचे केळीचे बाजारभाव केळींचा बाजारभाव पाहिला असता नाशिक बाजार समितीत भुसावळी केळीची 410    क्विंटलची आवक झाली. या बाजार समितीत सरासरी 1500 रुपयांचा बाजारभाव मिळाला. जळगाव    बाजार समितीत सरासरी केवळ 450 रुपयांचा दर मिळाला. नागपूर बाजार समितीत देखील केळीला प्रति क्विंटलमागे अवघा 525 रुपये दर मिळाला. पुणे बाजार समितीत 42 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी सरासरी 1100 रुपये दर मिळाला. पुणे-मोशी बाजार समितीत सरासरी 3250 रुपये असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला. एकीकडे जळगाव जिल्ह्यात केळीचे चांगले उत्पादन असताना जळगावमध्येच केळीला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याचे चित्र आहे. 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीमार्केट यार्डद्राक्षेकेळीजळगावनाशिक